लालू बॅडमिंटन खेळतात, मग जामीन कशासाठी? सीबीआयच्या वकिलांचा दावा | पुढारी

लालू बॅडमिंटन खेळतात, मग जामीन कशासाठी? सीबीआयच्या वकिलांचा दावा

पाटना, वृत्तसंस्था : चारा घोटाळ्याप्रकरणी राजद प्रमुख लालूप्रसाद यांचा जामीन रद्द करण्यावर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. लालू यांच्या किडनी प्रत्यारोपणचा हवाला देत सीबीआय त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवण्याच्या तयारीत असल्याचे लालूंचे वकील अ‍ॅड. कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. याला विरोधात सीबीआयचे वकील म्हणाले की, लालूप्रसाद यादव हे बॅडमिंटन खेळत असतात. त्यामुळे त्यांना जमीन देण्याचा निर्णय चुकीचा असून सुनावणीदरम्यान ते मी सिद्ध करू. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 17 ऑक्टोबरला होणार आहे.

जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी या आरोपावरूनही राऊज व्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणात लालू यांच्याशिवाय बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, राज्यसभा खासदार मीसा भारतीसह अन्य लोकांच्या विरोधात सीबीआयकडून युक्तिवाद करण्यात आला. दरम्यान लालू प्रसाद यादव यांना सीबीआयकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याची टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे. ते म्हणाले, आगामी 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे काम भाजप सरकारकडून केले जात आहे.

Back to top button