Jan Dhan Accounts: ‘जनधन’ खात्यांनी पार केला ५० कोटींचा टप्पा; पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद | पुढारी

Jan Dhan Accounts: 'जनधन' खात्यांनी पार केला ५० कोटींचा टप्पा; पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: जनधन खात्यांनी महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.१९) आनंद व्यक्त केला. जनधन खात्यांनी ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. यातील निम्मी खाती नारी शक्तीची असणे हे अधिक आनंददायी आहे असे ट्वीट पंतप्रधानांनी (Jan Dhan Accounts) केले आहे.
“हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. जनधन मधील निम्मी खाती म्हणजे ५६% खाती ही नारी शक्तीची असणे हे अत्यंत आनंददायी आहे. यातील निम्म्याहून अधिक खाती आपल्या नारी शक्तीची आहेत हे पाहून आनंद होतो. पीएम मोदी यांनी पीआयबीचा हवाला देत, ही माहिती दिली आहे. ग्रामीण आणि निम-शहरी भागात ६७% खाती उघडण्यात आलीत, यातून आम्ही हे देखील सुनिश्चित करत आहोत की, आर्थिक समावेशाचे फायदे (Jan Dhan Accounts) आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील.” असे ट्वीट पंतप्रधानांनी केले.

Jan Dhan Accounts: जन धन योजनेतील ५६% खाती महिलांची

प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) या नावाने प्रसिद्ध असलेल्या आर्थिक समावेशावरील राष्ट्रीय मिशन २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू करण्यात आले आणि त्याला जवळपास ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. बँकांनी सादर केलेल्या ताज्या अहवालानुसार ९ ऑगस्ट २०२३ पर्यंत एकूण जन धन खात्यांची संख्या ५० कोटींच्या पुढे गेली आहे. यापैकी ५६% खाती महिलांची आहेत आणि ६७% खाती ग्रामीण/निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत, अशी माहिती ‘पीआयबी‘ने दिली आहे.

हेही वाचा:

Back to top button