नेहरू म्युझियम नाव बदलावर राहुल गांधी म्‍हणाले, ‘नेहरु त्‍यांच्‍या नावासाठी…’

राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)
राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍लीतील नेहरु म्युझियमच्या नावात बदल केल्‍या प्रकरणी आज (दि.१७) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. लडाखला रवाना होण्‍यापूर्वी विमानतळावर 'एएनआय'शी ते बोलत होते.

यावेळी राहुल गांधी म्‍हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरु हे त्‍यांच्‍या नावाने नाही तर त्‍यांच्‍या कार्यासाठी ओळखले जातात. या मुद्द्यावर भाजप-काँग्रेसमध्ये झालेल्या आरोप-प्रत्‍यारोपानंतर राहुल गांधी यांनी अप्रत्‍यक्षपणे केंद्र सरकारवर निशाणा साधला.

सांस्‍कृतिक मंत्रालयाने सांगितले होते नाव बदलामागील कारण

नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे १४ ऑगस्‍टपासून नाव बदलण्‍यात आले. आता याची ओळख पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी अशी झाली आहे. याबाबत सांस्‍कृतिक मंत्रालयाने म्‍हटले होते की, "जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन आणि योगदानावरील तांत्रिकदृष्ट्या प्रगत प्रदर्शनांसह आता पूर्णपणे अद्यतनित केले गेले आहे. नवीन इमारतीत असलेले हे संग्रहालय आजवरच्‍या देशाच्‍या पंतप्रधानांनी विविध आव्हानांमधून कसे मार्गक्रमण केले आणि देशाची सर्वांगीण प्रगती कशी केली याची माहिती देते. त्यामुळे संस्थात्मक स्मृतींचे लोकशाहीकरण होते,

नेहरूवादी वारसा नाकारणे हा त्यांचा एककलमी अजेंडा : जयराम रमेश

नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे नाव बदल्‍याने अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या कायद्याचा तीव्र निषेध केला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी बुधवारी ट्विटरवर म्हटले होते की, " पंतप्रधान मोदींकडे भीती, गुंतागुंत आणि असुरक्षिततेचा मोठा समूह आहे. विशेषत: जेव्हा आपल्या पहिल्या आणि सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या पंतप्रधानांचा विचार केला जातो. नेहरू आणि नेहरूवादी वारसा नाकारणे, बदनामी करणे आणि नष्ट करणे हा त्यांचा एककलमी अजेंडा आहे."

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news