Hindi films in Manipur : मणिपूरवासियांनी २३ वर्षांनंतर पाहिला हिंदी चित्रपट; बॉलिवूडचा आनंद घेत स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष | पुढारी

Hindi films in Manipur : मणिपूरवासियांनी २३ वर्षांनंतर पाहिला हिंदी चित्रपट; बॉलिवूडचा आनंद घेत स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hindi films in Manipur : मणिपूरमध्ये गेली कित्येक वर्षे बॉलिवूड चित्रपट पाहण्यावर बंदी होती. मंगळवारी (दि. १५) येथील लोकांनी तब्बल २३ वर्षांनी हिंदी चित्रपट पहात स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. मणिपूरच्या एका आदिवासी विद्यार्थी संघटनेने हे चित्रपट सर्वांना दाखविले.

मणिपूरच्या हमर स्टुडंट्स असोसिएशन (HSA) या आदिवासी संघटनेने मंगळवारी (दि. १५) चुराचंदपूर येथे बॉलिवूड चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. येथील लोकांनी हिंदी चित्रपट पाहात स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. तब्बल २० वर्षांनंतर या ठिकाणी हिंदी चित्रपट पाहिल्याचे सांगतिले जात आहे. मंगळवारी संध्याकाळी चुराचंदपूर जिल्ह्यातील रेंगकाई (लमका) येथे ‘उरी’ आणि ‘कुछ कुछ होता है’ या दोन चित्रपटांचे स्क्रीनिंग आयोजित केले होते. (Hindi films in Manipur)

हमर स्टुडंट्स असोसिएशनचे प्रतिनिधी लालसेमरंग म्हणाले की, भारतीय या नात्याने आपल्याला सार्वजनिक थिएटरमध्ये भारताच्या सर्व भागांतील कला आणि चित्रपट उपलब्ध असले पाहिजेत. मेईतेई दहशतवाद्यांनी हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्यामागचे मुख्य कारण म्हणजे ते हिंदी चित्रपटांना परदेशी चित्रपट मानत होते. मणिपुरी संस्कृतीवरही वाईट प्रभाव मानला जातो. ते म्हणाले, आजपर्यंत राज्य सरकार या बंदीला पाठीशी घालते, याची खंत आहे. होय, हिंदी चित्रपटांवर बंदी आहे. पूर्वी, लामका/तुइथ्रफई येथे काही सिनेमागृहे होती, परंतु 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घातल्यानंतर ते सर्व बंद झाले.

23 वर्षांपूर्वी मणिपूरमध्ये प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट

1998 मध्ये मणिपूरमध्ये ‘कुछ कुछ होता है’ प्रदर्शित झालेला शेवटचा हिंदी चित्रपट ‘होता. त्यानंतर 2000 मध्ये या ठिकाणी बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी घालण्यात आली होती. मेईतेई दहशतवादी या संघटनेने ही बंदी घातलेले होती.

हेही वाचा

Back to top button