

पुढारी ऑनलाइन डेस्क : NMML Changed to PMML : देशाचे माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संग्रहालयाचे नाव केंद्र सरकारने बदलले आहे. नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी (NMML) ऐवजी आता या संग्रहालयाचे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी असे नामकरण करण्यात आले आहे.
भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी हे नाव औपचारिक करण्यात आले आहे. नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी याची माहिती दिली, असे इंडिया टुडेने म्हटले आहे. तसेच पंतप्रधानांचे संग्रहालय आणि लायब्ररीच्या कार्यकारी परिषदेच्या उपाध्यक्षांनी देखील याची माहिती ट्विटर वर पोस्ट केली आहे.
जूनच्या मध्यात NMML सोसायटीच्या विशेष बैठकीत त्याचे नाव बदलून PMML सोसायटी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच सोसायटीचे उपाध्यक्ष हे होते. NMML Changed to PMML
सूत्रांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेला सांगितले की, नवीन नावावर अधिकृत शिक्का मारण्यासाठी काही प्रशासकीय प्रक्रियांची गरज होती आणि काही दिवसांपूर्वी अंतिम मंजुरी मिळाली. PMML अधिकार्यांनी 14 ऑगस्ट ही नाव बदलण्याची तारीख अंमलात आणण्याचा निर्णय घेतला होता, असे ते म्हणाले.
हे ही वाचा :