Hawaii wildfires : हवाई बेटावर लागलेल्या आगीत मृतांची संख्या ६७

Hawaii wildfires : हवाई बेटावर लागलेल्या आगीत मृतांची संख्या ६७

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेच्या हवाई राज्यातील माउइच्या (island of Maui) जंगलातील वणव्याने रौद्ररुप धारण केले आहे. या भीषण आगीत आतापर्यंत 67 लोकांचा (Maui wildfire death) होरपळून मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथे आग धुमसत आहे. (Hawaii wildfires)

हवाईचे गव्हर्नर जोश ग्रीन (Governor Josh Green) यांनी येथील या वणव्याला "हवाई राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती" असल्याचे म्हटले आहे. बेटाच्या पश्चिम किनार्‍यावरील पर्यटकांचे आकर्षण असलेला लाहैना या शहराचा ८० टक्के भाग उद्ध्वस्त झाला आहे आणि सुमारे १,७०० इमारती नष्ट झाल्या असल्याचे ग्रीन यांनी सांगितले. माउइच्या जंगलात आग मंगळवारी सुरू झाली आणि डोरा चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे ती वेगाने पसरली.

लाहैना येथील आग ८० आटोक्यात आली असली तरी तीन मुख्य ठिकाणच्या आगींपैकी कोणतीही आग अद्याप आटोक्यात आलेली नाही. ज्यो बायडेन प्रशासनाने या आगीच्या घटनेला "मोठ्या आपत्ती" म्हणून घोषित केले आहे. (Hawaii wildfires)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news