Lok Sabha FM Speech : अर्थमंत्री सीतारामन यांच्या अविश्वास प्रस्तावावरील भाषणा दरम्यान विरोधकांचा सभात्याग | पुढारी

Lok Sabha FM Speech : अर्थमंत्री सीतारामन यांच्या अविश्वास प्रस्तावावरील भाषणा दरम्यान विरोधकांचा सभात्याग

पुढारी ऑनलाइन डेस्क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अविश्वास प्रस्तावावरील भाषणादरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि द्रमुकच्या खासदारांचा लोकसभेतून सभात्याग केला.

लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेचा आजचा तिसरा दिवस आहे. आज संसदेत निर्मला सीतारामन यांनी भाषण केले. यांच्या भाषणा दरम्यान त्यांनी अनेक मुद्दे मांडले. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसच्या शासन काळातील भ्रष्टाचार तसेच आदी मुद्द्यांवर भाषण केले. तसेच विरोधकांवर निशाणा साधला.

तुम्ही लोकांना स्वप्ने दाखवता, पण आम्ही त्यांची स्वप्ने सत्यात उतरवतो. परिवर्तन हे केवळ बोलण्यातून नाही, तर ते प्रत्यक्ष कृतीतून होते. आम्ही सर्वांनाच सशक्त करण्यावर विश्वास ठेवतो, असे म्हणत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. संसद सभागृहात सुरू असलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना (No Confidence Motion) अर्थमंत्री सीतारमन यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. यूपीएने संपूर्ण दशक वाया घालवले. कारण त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार आणि घराणेशाही होती. आज प्रत्येक संकट आणि प्रतिकूल परिस्थिती सुधारण्यात आणि संधीमध्ये बदलली आहे, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.

आज भारतातील लोक ‘बन गये, मिल गये, आ गये’ असे म्हणतात- अर्थमंत्री सीतारामन

पुढे बोलताना सीतारामन म्हणाल्या, ‘बनेगा’, ‘मिलेगा’ असे शब्द आता लोक वापरात नाहीत, तर आज लोक ‘बन गये, मिल गये, आ गये’ असे शब्द वापरतात. यूपीएच्या काळात लोक ‘बिजली आएगी’ म्हणायचे, आता लोक ‘बिजली आ गई’ म्हणतात. विरोधक म्हणाले होते ‘गॅस कनेक्शन मिलेगा’, आता ‘गॅस कनेक्शन मिल गया’… असे म्हणतात. पूर्वी लोक विमानतळ ‘बनेगा’ म्हणालचे आता विमानतळ ‘बन गया’ असे म्हणतात, असे सीतारामन यांनी संसदेत (No Confidence Motion) बोलताना स्पष्ट केले.

सीतारामन यांच्या भाषणा दरम्यान विरोधकांचा सभात्याग

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अविश्वास प्रस्तावावरील भाषणादरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि द्रमुकच्या खासदारांचा लोकसभेतून सभात्याग केला.

हे ही वाचा :

No Confidence Motion | ‘यूपीए’च्या भ्रष्टाचाराने एक दशक वाया गेले, निर्मला सीतारामन यांचा विरोधकांवर निशाणा

मोदी सरकारने भारत दहशतवादमुक्त ठेवला : निर्मला सीतारामन

Back to top button