केरळचे नाव ‘केरळम’ करावे : विधानसभेने केली राज्यघटनेत दुरुस्तीची मागणी

केरळ राज्याचे नाव बदलून 'केरळम' (Keralam) करण्याची ठराव आज  विधानसभेत मांडताना मुख्यमंत्री पिनाराई विजयन.
केरळ राज्याचे नाव बदलून 'केरळम' (Keralam) करण्याची ठराव आज विधानसभेत मांडताना मुख्यमंत्री पिनाराई विजयन.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केरळ राज्याचे नाव बदलून 'केरळम' (Keralam) करण्याची ठराव आज (दि.९)  विधानसभेत एकमताने मजूर करण्‍यात आला. यासंदर्भातील ठराव मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मांडला. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व भाषांमध्ये राज्याचे नाव बदलून 'केरळम' करावे, अशी विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली आहे. विधानसभेने राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे, ज्यात राज्याचा उल्लेख 'केरळ' असा होतो.

केरळ राज्‍याचे नाव बदलून केरळम करावे, असा ठराव काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) ने कोणत्याही सुधारणा किंवा बदल न सुचवता स्वीकारला होता. त्यानंतर विधानसभा अध्‍यक्ष ए.एन. शमसीर यांनी आवाजी मताने विधानसभेने एकमताने हा ठराव मंजूर झाल्‍याची घोषणा केली.

Keralam : नावात बदल का केला ?

राज्‍याचे नाव बदलाचा ठराव मांडताना मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, राज्याला मल्याळम भाषेमध्ये 'केरळम' असे म्‍हटलं जाते. तर इतर भाषांमध्ये केरळ असे संभोधित करतात. मल्याळम भाषिक समुदायांसाठी संयुक्त केरळमची गरज राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासून प्रकर्षाने निर्माण झाली आहे. भारतीय राज्‍यघटनेच्‍या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळचे नाव नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news