Savaji & Ruvin Dholkia : सूरतचे प्रसिद्ध हिरे व्यापारी ढोलकिया यांच्या नातूने केली मोलमजुरी! कारण कोट्यधीश आजोबांनी…

Savaji & Ruvin Dholkia
Savaji & Ruvin Dholkia

पुढारी ऑनलाइन डेस्क : Savaji & Ruvin Dholkia : आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसमध्ये 'कार-फ्लॅट-आभूषण' देण्यासाठी प्रसिद्ध असलेले हिरे व्यापारी सावजी ढोलकिया हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण 12 हजार कोटींपेक्षा अधिक टर्नओव्हर असलेल्या हिरे कंपनीचे मालक सावजी यांनी अमेरिकेतून 'MBA' ची पदवी घेऊन आलेल्या आपल्या नातवाला थेट मजुरी करण्यासाठी अज्ञातवासात पाठवले. तर नातू रुविन ढोलकियाने देखील आपल्या आजोबांना नाराज न करता त्यांच्या इच्छे खातिर पूर्ण एक महिना आपली ओळख लपवून वेगवेगळ्या ठिकाणी सेल्समन, वेटर आणि मजुराचे काम केले. सध्या रुविन ढोलकिया आणि सावजी ढोलकिया हे खूप चर्चेत आहेत. रूविन याने त्याचा अनुभव सांगितला आहे.

सावजी ढोलकिया हे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खूप उदार मानले जातात. ते आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसमध्ये कार-फ्लॅट आणि आभूषणे देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचा एकूण व्यवसाय 12 हजार कोटींपेक्षाही जास्त रुपयांचा आहे. त्यांचा नातू अमेरिकेतून आपली MBA ची पदवी घेऊन परत आला होता. मात्र, त्याला आपल्या व्यवसायात रुजू करून घेण्याऐवजी सावजी यांनी त्याला थेट अज्ञात स्थळी आपल्या ओळखीचा वापर न करता काम करून येण्यास सांगितले. तसेच त्याला घरातून फक्त ६००० रुपये अतितटीच्या प्रसंगासाठी देण्यात आले. याविषयी सावजी यांनी म्हटले की बिजनेस स्कूलमधील शिक्षेसोबत वास्तविक जीवनातील शिक्षा मिळवावी यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

Savaji & Ruvin Dholkia : कुठे गेला रुविन काय केले त्याने या काळात?

आजोबांचा आदेश मान्य करत रूविन ढोलकिया 30 जूनला सूरत सोडून थेट चेन्नई गाठली. इथे त्याला त्याच्या एमबीएची कोणतीही पदवी न वापरता त्याची खरी ओळख न सांगता काम मिळवायचे होते. त्याच्याजवळ खिशात फक्त ६००० रुपये होते. त्याला दिवसाला फक्त २०० रुपये खर्च करण्याची मुभा होती. इतकेच काय तर त्याला मोबाईल वापरण्याची देखील परवानगी सावजी यांनी दिली नाही.

Savaji & Ruvin Dholkia : अमेरिकेतील MBA रूविन याला नोकरीसाठी वनवन भटकावे लागले

रूविन याला चेन्नईला पोहोचल्यानंतर पहिले नोकरी शोधायची होती. त्याला वाटले की त्याला सहज काम मिळेल मात्र याचे अगदी विपरित घडले. रुविनला सुरुवातीला नोकरीसाठी अनेक ठिकाणी नकार मिळाला. रूविन सांगतो मला सातत्याने रिजेक्शनचा सामना करावा लागला. खूप प्रयत्नानंतर मला पहिली नोकरी अखेर एका कापडाच्या दुकानात मिळाली. सेल्समन शिपची ती नोकरी होती. हे दुकान चेन्नई हाईकोर्टच्या मेट्रोच्या जवळ आहे. इथे रूविनने ९ दिवस काम केले यावेळी त्याने स्वतःतील विक्री कौशल्य विकसित केले.

पुढे रूविनने आणखी ८ दिवस एका भोजनालयात वेटरचे काम केले. तिथे त्याने प्लेट सेटिंग आणि चांगल्या वाढपीचे कौशल्य आत्मसात केले. हे काम सोडल्यानंतर पुढे ९ दिवस एका घड्याळाच्या दुकानात सेल्समनचे काम केले. यावेळी त्याने घडी रिपेअरिंगच्या कामात मदत करून ते कौशल्यही आत्मसात केले. नंतर त्याने शेवटची नोकरी त्याने एका बॅग आणि सामानाच्या दुकानात केली. तिथे त्याने दोन दिवस मजूर म्हणून काम केले.

Savaji & Ruvin Dholkia : रूविनने काय अनुभव घेतला

रूविनने आपल्या या एक महिन्याच्या अज्ञातवासात चार वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या. तत्पूर्वी त्याला ८० पेक्षा जास्त वेळा रिजेक्शनचा सामना करावा लागला. या दरम्यान रुविन चेन्नईतील एका छोट्याशा मुलांच्या वसतिगृहात राहिला. महिनाभरात त्याने अनेकवेळा एक वेळ जेवण केले.

रुविनने सांगितले की याला एक आव्हान म्हणून घेण्यापेक्षा मी एक संधीच्या रुपात पाहतो. या सामान्य जीवनाने मला आवश्यकतेचे मूल्य समजले. जेव्हा-जेव्हा मला नोकरीसाठी नकार ऐकायला मिळाला. तेव्हा मला या 'न' चा त्रास काय आहे तो समजला. आयुष्यात पहिल्यांदा कमतरतेचा अनुभव घेतला.

Savaji & Ruvin Dholkia : ते २७ रुपये कोट्यावधी रुपयांसारखे भासत होते

वेटरचे काम करताना मिळालेली २७ रुपयाची टिप कोट्यावधी रुपयांप्रमाणे वाटली. रुविन सांगतो ते २७ रुपये माझ्यासाठी सर्वात खास होते. पण वेटरची नोकरी सोडताना त्या हॉटेलच्या मालकाने जेव्हा त्यांना पगार देण्यासाठी ६ तास उभे केले. नंतर त्याच्यासमोर २००० रुपये फेकले त्यावेळी समजले की मेहनत करणाऱ्यांसोबत कसा व्यवहार करायला हवा. त्याला ज्या गोष्टीचा सामना करावा लागला तो त्याच्या जीवनात कधीही कोणासोबतही वागणार नाही. तर बॅगच्या दुकानात १०-११ तास जमिनीवर बसून जेव्हा काम करावे लागले तेव्हा काम आणि कष्टाचे मोल समजले.

Savaji & Ruvin Dholkia : एक महिन्याच्या अज्ञातवासात रुविनच्या कष्टाची कमाई

या एक महिन्याच्या अज्ञातवासात रुविन याने ८६०० रुपये कमावले. ३० जुलैला त्याचा हा अज्ञातवास संपला. रुविन जेव्हा आपली कठीण यात्रा संपवून पुन्हा आला. तेव्हा त्याच्या घरच्यांनी त्याचे स्वागत केले. रुविन देवाचे आभार मानतो की त्याचा इतक्या चांगल्या परिवारात जन्म झाला.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news