मणिपुरातील संचारबंदी काही प्रमाणात शिथिल | पुढारी

मणिपुरातील संचारबंदी काही प्रमाणात शिथिल

इम्फाळ; वृत्तसंस्था : मणिपूरमधील तणाव नियंत्रणात येत असल्याने संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत होत असल्याने टप्प्याटप्प्याने संचारबंदी हटविण्यात येणार असल्याचे संकेत उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. दरम्यान, मंगळवारी कृती समितीच्या अध्यक्षांवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आज पश्चिम इम्फाळमधील दोन घरे पेटवून देण्यात आली.

या दोन्ही घरांत कुणीच नसल्याचे पाहून अज्ञातांनी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे तणावसद़ृश परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या वतीने मणिपूरला भेट देऊन पीडितांच्या कुटुंबीयांसह विविध संघटनांची भेट?घेण्यात आली. विरोधकांनी मणिपूर प्रश्नावरून संसदेचे कामकाज रोखून ठेवल्याने अविश्वास प्रस्तावावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी याप्रश्नी निवेदन सादर करण्याची शक्यता आहे.

Back to top button