

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीने (UGC) देशातील 20 बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. या बनावट विद्यापीठांना (Fake Universities) पदवी देण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे युजीसीने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे बनावट 20 पैकी 8 विद्यापीठे दिल्लीतील आहेत. (UGC Big Decision)
युजीसी कायद्यातील (UGC Law) तरतुदींच्या विरोधात जाऊन ही विद्यापीठे (Universities) चालवली जात असल्याचे तपासणीत आढळून आले होते. या विद्यापीठांकडून दिल्या जाणाऱ्या पदव्या वैध नाही तसेच पुढील उच्च शिक्षणासाठी त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने सचिव मनीष जोशी यांनी सांगितले. (UGC Big Decision)
बनावट विद्यापीठांमध्ये (Fake Universities) दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस, कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, व्होकेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर सेन्ट्रीक ज्युरिडीशियल युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग, विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी आणि आध्यात्मिक विश्वविद्यालय यांचा समावेश आहे. (UGC Big Decision)
उत्तर प्रदेशात चार बनावट विद्यापीठे (Fake Universities) असून त्यात गांधी हिंदी विद्यापीठ, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, नेताजी सुभाषचंद्र बोस ओपन युनिव्हर्सिटी व भारतीय शिक्षा परिषद यांचा समावेश आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, पुदूचेरी, आंध्र प्रदेश, प. बंगाल आणि केरळ या राज्यांमध्येही बनावट विद्यापीठे असल्याचे युजीसीकडून सांगण्यात आले आहे.