2000 notes back in banking system : २ हजार रुपयांच्या ८० टक्के नोटांची बँकवापसी | पुढारी

2000 notes back in banking system : २ हजार रुपयांच्या ८० टक्के नोटांची बँकवापसी

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने २ हजार रुपयांच्या चलनी नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, भारतीय नागरिकांना या नोटा बँकेत जमा करण्यासाठी सांगण्यात आले होते. (2000 notes back in banking system) ३० जूनपर्यंत २ हजारांच्या ८० टक्के नोटा नागरिकांनी बँकेत जमा केल्या आहेत. रिझर्व बँकेच्या या निर्णयानंतर सहा आठवड्यांमध्ये ७७ टक्के नोटा बँकिंग प्रणालीद्वारे परत आल्या असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. (2000 notes back in banking system)

१९ मे रोजी केली होती घोषणा (2000 notes back in banking system)

आरबीआयने १९ मे रोजी चलनात असलेल्या २ हजारांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली होती. यानंतर नागरिकांना आणि व्यवसायांना ३० सप्टेंबरपर्यंत त्या बँक खात्यात जमा करण्यासाठी किंवा त्या बदलून घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. (2000 notes back in banking system) नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर आरबीआयने २ हजारांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. रिझर्व बँकेच्या मते, मार्च २०१७ पूर्वी जारी केलेल्या २ हजारांच्या ८९ टक्के नोटांचे आयुष्य ४ ते ५ वर्षांच्या समाप्तीच्या जवळ होते. आरबीआयने असेही सांगितले की त्यांच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की लोक व्यवहारासाठी २ हजारांच्या नोटांकडे उत्सुक नव्हते. (2000 notes back in banking system)

हेही वाचलंत का?

Back to top button