ISRO चे मोठे यश, 7 उपग्रहांसह प्रक्षेपित केले PSLV-C56

ISRO
ISRO
Published on
Updated on

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. ISRO ने सतीश धवन अंतराळ केंद्र (SDSC) सार, श्रीहरिकोटा येथून सहा सह-प्रवासी उपग्रहांसह PSLV-C56 यशस्‍वी प्रक्षेपित केले आहेत. PSLV चे हे 58 वे उड्डाण आहे. हे पूर्णपणे व्यावसायिक मिशन आहे, जे न्यूस्पेस इंडिया लिमिटेडद्वारे संचालित केले जात आहे. 360 किलो वजनाचा DS-SAR उपग्रह सिंगापूरची सरकारी संस्था DSTA आणि सिंगापूर कंपनी ST इंजिनियरिंग यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. यामध्ये इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने विकसित केलेले सिंथेटिक एपर्चर रडार पेलोड आहे, जे सर्व हवामानात छायाचित्रे घेण्यास सक्षम आहे.

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ, यांनी अभिनंदन करत आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "अभिनंदन, प्राथमिक उपग्रह DS-SAR सह सात उपग्रह घेऊन जाणारे PSLV-C56 आणि 6 सह-प्रवासी उपग्रह योग्य कक्षेत यशस्वीरित्या ठेवण्यात आले आहेत."

DS-SAR उपग्रह विषयी…

DS-SAR उपग्रह DSTA (सिंगापूर सरकार) आणि ST अभियांत्रिकी यांच्यातील भागीदारी अंतर्गत विकसित करण्यात आला आहे. हा उपग्रह कार्यान्वित झाल्यानंतर तो सिंगापूर सरकारमधील विविध एजन्सीच्या उपग्रह इमेजरी आवश्यकतांना (satellite imagery requirements) सपोर्ट देण्यासाठी त्याचा उपयोग होईल. एसटी अभियांत्रिकी त्याचा वापर त्यांच्या व्यावसायिक ग्राहकांसाठी मल्टी-मॉडल आणि हायर रिस्पॉन्सिव्हनेस इमेजरी आणि भू-स्थानिक सेवांसाठी करणार आहे.

DS-SAR वर इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) द्वारे विकसित केलेले सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) पेलोड आहे. हा DS-SAR ला हवामानाचे सर्व दिवस आणि रात्र कव्हरेज प्रदान करण्यास अनुमती देते.

इतर ६ उपग्रह कोणते?

१. VELOX-AM- हा एक २३ किलो वजनाचा तंत्रज्ञान प्रात्यक्षिक सूक्ष्म उपग्रह.
२. आर्केड अॅटमॉस्फेरिक कपलिंग अँड डायनॅमिक्स एक्सप्लोरर (ARCADE)- एक प्रायोगिक उपग्रह.
३. SCOOB-II- हा एक 3U नॅनोसॅटलाइट तंत्रज्ञान प्रात्यक्षिक पेलोड आहे.
४. NuLIoN by NuSpace- शहरी आणि दुर्गम अशा दोन्ही ठिकाणी अखंड IoT कनेक्टिव्हिटी सक्षम करणारा प्रगत 3U नॅनोसॅटलाइट.
५. गॅलेसिया-2 (Galassia-2)- एक 3U नॅनोसॅटलाइट आहे, जो पृथ्वीच्या कमी कक्षेत फिरत राहील.
६. ORB-12 STRIDER – हा उपग्रह आंतरराष्ट्रीय सहकार्याने विकसित केला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news