

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडिया (India) हा शब्द वसाहतवादी गुलामगिरीच्या मानसिकतेच प्रतिक असून हा शब्द राज्यघटनेतून हटवण्यात यावा, अशी मागणी भाजपचे राज्यसभेतील खासदार नरेश बन्सल यांनी सभागृहात केली, त्यामुळे नाव राजकीय वाद निर्माण झाला आहे. (Remove India from constitution, demand BJP MP)
विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीला Indian National Development Inclusive Alliance (INDIA) असे नाव दिले आहे, यावर भारतीय जनता पक्षाने सातत्याने टीका करत India हा शब्द वसाहतवादी मानसिकतेचे प्रतिक असल्याची टीका वारंवार केली आहे. तर केंद्र सरकारच्या स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया अशा किती तरी योजनांच्या नावात India हा शब्द असा पलटवार केला आहे.
शुक्रवारी राज्यसभेच्या कामकाजात बन्सल यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, "ब्रिटिशांनी भारत हे नाव बदलून इंडिया असे नामकरण केले. भारतीय राज्यघटनेत India That is Bharat असा उल्लेख आहे. गेली हजारो वर्षं आपल्या देशाची ओळख भारत अशीच आहे. हा उल्लेख प्राचीन संस्कृत ग्रंथातही आहे. India हे गुलामगिरीचे प्रतिक आहे, त्यामुळे India हा शब्द राज्यघटनेतून वगळ्यात यावा."
ते म्हणाले, "गेल्या वर्षी १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात गुलामगिरीची प्रतिकं हटवली जातील, असा उल्लेख केला होता. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात घटनेत फक्त भारत असा उल्लेख ठेवला जावा." टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. बन्सल यांनी त्यांच्या ट्वीटरवरही ही मागणी केली आहे.
India विरुद्ध भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जुलैला राजस्थानातील एका समारंभात विरोधकांच्या INDIA हा नव्या नामकरणावर टीका केली होती. सरंजामशाही, भ्रष्टाचार हटवून समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी महात्मा गांधीच्या Quit India चळवळीची पुन्हा गरज आहे. INDIA हे नवा लावून जुन्या कारनाम्यांवर ते पडदा टाकू इच्छित आहेत, त्यांनी कधी भारताची काळजी केली आहे का? अशी टीका त्यांनी केली होती.
हेही वाचा