Cases Pending in High Court : उच्च न्यायालयांमध्ये 71 हजारांपेक्षा जास्त खटले 30 वर्षांहून जास्त काळ प्रलंबित! | पुढारी

Cases Pending in High Court : उच्च न्यायालयांमध्ये 71 हजारांपेक्षा जास्त खटले 30 वर्षांहून जास्त काळ प्रलंबित!

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Cases Pending in High Court : देशातील उच्च न्यायालयांमध्ये 71 हजारांपेक्षा जास्त खटले 30 वर्षांहून जास्त काळ प्रलंबित असल्याची माहिती कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी शुक्रवारी (दि. 28) लोकसभेत लेखी उत्तरादाखल दिली. कनिष्ठ न्यायालयांचा विचार केला तर या न्यायालयांमध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या एक लाखाच्या वर आहे, असेही मेघवाल यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालय, 25 उच्च न्यायालये आणि कनिष्ठ न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या एकूण खटल्यांची संख्या पाच कोटींच्या वर गेली असल्याची माहिती मेघवाल यांनी अलिकडेच राज्यसभेत दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या इंटिग्रेटेड केस मॅनेजमेंट सिस्टीम कडील माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची एकूण संख्या 69 हजार 766 इतकी आहे. 25 उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले एकूण खटले 60 लाख 62 हजार 953 इतके आहेत. तर देशभरातील कनिष्ठ न्यायालयांमधील प्रलंबित खटल्यांची एकूण संख्या 4 कोटी 41 लाख 35 हजार 357 इतकी आहे.

Back to top button