UGC NET Result 2023: यूजीसी नेटचा निकाल जाहीर, येथे पाहा तुमचा निकाल | पुढारी

UGC NET Result 2023: यूजीसी नेटचा निकाल जाहीर, येथे पाहा तुमचा निकाल

पुढारी ऑनलाईन: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) यूजीसी नेटचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांना हा निकाल ntaresults.nic.in आणि ugcnet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ने 6 जुलै रोजी UGC NET जून 2023 ची अन्सर की प्रसिद्ध केली होती. यूजीसी नेट जून 2023 परीक्षा देशभरातील 181 शहरांमध्ये 83 विषयांसाठी घेण्यात आली होती. ही परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली होती. पहिला टप्पा 13 ते 17 जून आणि दुसरा टप्पा 19 ते 22 जून 2023 दरम्यान होता. 6,39,069 उमेदवार हे यावेळी परीक्षेसाठी पात्र ठरले होते.

UGC NET निकाल 2023 कसा डाउनलोड करायचा?

1: ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा
2: UGC NET जून 2023 निकालासाठीच्या असलेल्या लिंकवर क्लिक करा.
3: त्यानंतर तुमचे लॉगिन डिटेल्स भरा
4: त्यानंतर तुमचे UGC NET जून 2023 स्कोअरकार्ड स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
5: स्कोअरकार्ड स्क्रीनवर प्रदर्शित झाल्यानंतर तुम्हाला ते डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट काढता येईल

स्कोअर कार्ड डाउनलोड उमेदवाराला करण्यात काही अडचण आल्यास ते ugcnet@nta.ac.in वर मेल करू शकतात. तसेच उमेदवार अधिक माहितीसाठी एनटीएच्या अधिकृत वेबसाइट https://ugcnet.nta.nic.in ला भेट देऊ शकतात.एनटीएद्वारे पात्र झालेल्या उमेदवारांना ई-प्रमाणपत्रे आणि जीआरएफचे पत्र लवकरच जारी केले जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांना अधिक माहिती आणि तपशिलासाठी अधिकृत वेबसाइटल भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा:

नाशिक: रस्त्याअभावी रूग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू

धुळे: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा महापालिका आयुक्तांना घेराव

धुळे मनपा हद्दीतील 11 गावांचे प्रश्‍न केव्हा सोडणार? आमदार कुणाल पाटील यांनी विधानसभेत उठविला आवाज

 

Back to top button