राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना प्रत्‍युत्तर, “तुम्‍ही आम्‍हाला काहीही … “

राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)
राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  ब्रिटीशांच्‍या ईस्‍ट इंडिया कंपनीतही इंडिया नाव होते. तसेच इंडियन मुजाहिदीनमध्‍ये इंडिया नावाचा उल्‍लेख आहे. त्‍यामुळे नुसते इंडिया नाव ठेवल्‍याने काही होत नाही, अशा शब्‍दांमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आज (दि.२५ ) विरोधी पक्षांच्‍या I.N.D.I.A. आघाडीवर हल्‍लाबोल केला होता. याला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्‍विटरच्‍या माध्‍यमातून प्रत्‍युत्तर दिले.

राहुल गांधींनी ट्विटमध्‍ये म्‍हटलं आहे की, तुम्‍ही आम्‍हाला काहीही म्‍हटलं तरी आम्‍ही इंडिया आहोत. आम्ही मणिपूरमधील प्रत्येक स्त्री आणि मुलाचे अश्रू पुसू. आम्ही मणिपूरमध्ये भारताच्या कल्पनेची पुनर्बांधणी करू. आम्ही तेथील सर्व लोकांमध्ये प्रेम आणि शांतता परत आणू.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news