Oppenheimer controversy | ओपेनहायमर-भगवद्गीता वादात राम गोपाल वर्मांची उडी

Oppenheimer controversy | ओपेनहायमर-भगवद्गीता वादात राम गोपाल वर्मांची उडी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'ओपेनहायमर' चित्रपटातील एका दृश्यामध्ये भगवद्गीतेच्या एका श्लोकाचा वापर करण्यात आला आहे. त्यावरून वादाला (Oppenheimer Controversy) सुरू आहे. आता या वादात चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी उडी घेतली आहे. त्यांनी ट्विटरवर या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले की, "विडंबना अशी आहे की ओपेनहायमर या अमेरिकन अणुशास्त्रज्ञाने भगवद्गीता वाचली आहे. जी 0.0000001% भारतीयांनी वाचली आहे. याबद्दल मला शंका आहे."

दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनच्या 'ओपेनहायमर' या हॉलिवूडपटावरून भारतात वाद सुरू (Oppenheimer Controversy) झाला आहे. अणुबॉम्बचे जनक म्हटल्या जाणार्‍या वैज्ञानिक रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात भगवद्गीतेचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रथम, अणुबॉम्बच्या चाचणीनंतर, ओपेनहायमरने आपल्या भाषणात गीतेच्या श्लोकाबद्दल सांगितले. दुसरा उल्लेख म्हणजे चित्रपटातील एका इंटिमेट दृश्यादरम्यान गीता वाचण्यात आली. तर ओपेनहायमर (सिलियन मर्फी) सेक्स करताना भगवद्गीतेचे वाचन करताना दिसत आहे. यावरून भारतीय प्रेक्षकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटांमध्ये नेहमीच भारताशी संबंधित कनेक्शन असते. डार्क नाइट राइजेसचे शूटिंग भारतात झाले. त्याचप्रमाणे टेनेटचे काही भागही भारतात शूट करण्यात आले. इंटरस्टेलरमध्ये, नोलनने भारताच्या भविष्याची कल्पना केली, जिथे देश खूप प्रगत झाला आहे. आता ओपनहायमरमध्ये 'गीता'चे उल्लेख केला आहे. मात्र, ज्या दृश्यात त्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावर भारतीयांनी आक्षेप घेतला आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सेन्सॉर बोर्डाला हा सीन हटवण्यास सांगितले आहे. दरम्यान, बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत'मध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारणाऱ्या नितीश भारद्वाज यांनीही ओपेनहायमर या चित्रपटात भगवत गीतेचा श्लोक वापरल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news