चांद्रयान-३ लवकरच चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार

चांद्रयान-३ लवकरच चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार

पुढारी ऑनलाईन: भारताचे चांद्रयान-3 हे चंद्राच्या कक्षेच्या अगदी जवळ पोहचले आहे. चांद्रयान लवकरच पृथ्वीची चौथी कक्षा पूर्ण करून अंतिम पाचव्या कक्षेत प्रवेश करणाार आहे. त्यानंतर ५ ऑगस्टपर्यंत ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार असल्याची माहिती आज ( दि. २४) केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

चांद्रयान-३ हे उद्या (दि.२४ जुलै) चंद्राच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकणार आहे. उद्या (दि.२५ जुलै) दुपारी २ ते ३ वाजताच्या दरम्यान चांद्रयान-३ पृथ्वीची आणखी एक कक्षा पूर्ण करणार आहे. यापूर्वी चांद्रयानाने १८ जुलै रोजी पृथ्वीची दुसरी कक्षा पूर्ण करून तिसऱ्या कक्षेत प्रवेश केला होता. आत्ता उद्या (दि.२५ जुलै) हे चांद्रयान पृथ्वीची चौथी कक्षा पूर्ण करून पाचव्या कक्षेत प्रवेश करणार आहे. त्यानंतर ही पृथ्वीची ही कक्षा पूर्ण करून ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, असे इस्त्रोने सांगितले आहे.

Chandrayan 3 : 5 ऑगस्टला यान चंद्राच्या कक्षेत

इस्रोच्या माहितीनुसार, 5 ऑगस्टला यान चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. एकदा यानाने चंद्राच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात प्रवेश केल्यावर, त्याची उंची हळूहळू कमी करण्यासाठी आणि चंद्राभोवती वर्तुळाकार कक्षेत प्रवेश करण्यासाठी कक्षा-कमी करणार्‍या युक्तीच्या मालिकेतून जाईल. तर 23 ऑगस्टला यानाला चंद्रावर लँड करण्याची योजना आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news