अँटिलिया प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्माला दिलासा; पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी दोन आठवड्यांचा अंतरिम जामीन | पुढारी

अँटिलिया प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्माला दिलासा; पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी दोन आठवड्यांचा अंतरिम जामीन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईतील ‘अँटिलिया’ प्रकरणात अटकेत असलेले पोलीस दलातील माजी पोलीस कर्मचारी प्रदीप शर्मांना सोमवारी (दि.२४ जुलै) सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला. शर्माला त्यांचा पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी दोन आठवड्यांचा अंतरिम जामीन देण्यात आला आहे.एनकाउंटर स्पेशलिस्ट अशी शर्माची ओळख होते.यापूर्वी त्यांना ५ जून रोजी आजारी पत्नीची देखभाल करण्यासाठी तीन आठवड्यांचा अंतरिम जामीन देण्यात आला होता.दरम्यान, सोमवारी सकाळी साडे दहा वाजता सर्वोच्च न्यायालयाने शर्माच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावणी घेतली.

रक्तदाबातील चढ-उतारामुळे शर्मा यांच्या पत्नीची अद्यापही शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही,असे शर्माच्या वतीने वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले.दरम्यान, जामीन दोन आठवड्यासाठी वाढत असून शस्त्रक्रिया झाली नाही तर शर्मांना आत्मसमर्पण करावे लागेल,असे न्यायालयाने स्पष्ट करीत जामीन मंजूर केला. याप्रकरणावर ७ ऑगस्टला पुढील सुनावणी होईल.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थान अँटिलिया बाहेर विस्फोटकांनी भरलेली एक एसयूव्ही कार पार्किंग आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्माला अटक केली होती.शर्माला इतर आरोपींच्या जबाबाच्या आधारे जून २०२१ मध्ये अटक करण्यात आली आहे.एनकाउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळख असलेले शर्मा याला मुंबई पोलीस दलाचे माजी पोलीस कर्मचारी सचिव वाझेचे निकटवर्ती मानले जाते.वाझेला एनआयएने दोन्ही प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून अटक केली आहे.

Back to top button