छत्तीसगड- तेलंगणा सीमेवर चकमक; ६ नक्षली ठार, २ पोलीस जखमी

Telangana Encounter | दोन दिवसांतील दुसरी मोठी कारवाई
Telangana Encounter
छत्तीसगड- तेलंगणा सीमेजवळ गुरुवारी पोलीस दलांशी झालेल्या चकमकीत ६ नक्षली ठार झाले.(File Photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

छत्तीसगडला लागून असलेल्या सीमेजवळील तेलंगणातील (Telangana Encounter) भद्राद्री कोथागुडेम येथे गुरुवारी पोलीस दलांशी झालेल्या चकमकीत ६ नक्षली ठार झाले. असे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. या चकमकीदरम्यान दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. कारकागुडेम मंडलातील रघुनाथपालेमजवळील जंगल भागात पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान ही चकमक झाली. दोन दिवसांतील ही दुसरी मोठी कारवाई आहे. (anti-Naxal operation)

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी दंतेवाडा आणि विजापूरच्या सीमेवरील जंगल परिसरात केलेल्या नक्षलविरोधी कारवाईत ६ महिलांसह ९ नक्षलवाद्यांना ठार केले होते. यानंतर दोनच दिवसांनी ६ नक्षल्यांना ठार करण्याची घटना घडली आहे. या संयुक्त मोहिमेमध्ये विविध विभागातील विविध सुरक्षा तुकड्यांचा समावेश होता.

Telangana Encounter : मृतांमध्ये लछन्ना याचा समावेश

६ मृतांमध्ये सीपीआय (Maoist) पक्षाच्या मनुगूरू क्षेत्र समितीचा सचिव लछन्ना याचा समावेश आहे. मनुगूरू क्षेत्र समितीचे सचिव असलेल्या लछन्ना यांच्या नेतृत्वाखालील नक्षली गट गेल्या काही काळापासून छत्तीसगड- तेलंगणा सीमाभागात सक्रिय आहे. लछन्ना नुकताच छत्तीसगडमधून तेलंगणात स्थलांतरित झाल्याची माहिती होती.

Telangana Encounter
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर १२ नक्षल्यांना कंठस्नान

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news