South Africa Underground Gas Blast : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये ‘भूमिगत गॅस स्फोट’; 1 ठार 41 जखमी | पुढारी

South Africa Underground Gas Blast : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये 'भूमिगत गॅस स्फोट'; 1 ठार 41 जखमी

पुढारी ऑनलाइन डेस्क : South Africa Underground Gas Blast : दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये बुधवारी रात्री भूमिगत गॅसचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर 41 जण जखमी झाले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

एएनआयने टाइम्सलाइव्हने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्याने म्हटले आहे की, या स्फोटामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. घटनेत अनेक वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. तर स्फोटाचा वेग किंवा जोर इतका जास्त होता की त्यामुळे काहीजण रस्त्यावरून उडून गेले. South Africa Underground Gas Blast

दरम्यान, जोहान्सबर्गमधील सार्वजनिक सुरक्षेसाठी महापौर समितीच्या (MMC) सदस्याने ट्विटरवर सांगितले की, “जॉबर्ग CBD मध्ये काल रात्री भूमिगत गॅसचा स्फोट झाला तेव्हा सार्वजनिक सुरक्षेसाठी MMC डॉ Mgcinni Tshwaku घटनास्थळी होते. स्फोटाचे कारण आणि नुकसानीचे प्रमाण जाणून घेण्यासाठी आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आल्या होत्या.”

South Africa Underground Gas Blast : उशिराने, जोहान्सबर्ग शहर आपत्कालीन व्यवस्थापन सेवांचे प्रवक्ते, रॉबर्ट मुलाउडझी यांनी पुष्टी केली की त्यांनी एक मृतदेह बाहेर काढला आहे तर इतर जखमी आहेत.

मुलाउद्झी यांनी ट्विट करून “Joburg CBD (मध्यवर्ती व्यवसाय जिल्हा) स्फोट अद्यतन (Update) दिले, त्यांच्या ट्विटनुसार, अग्निशमन दलाने एक मृतदेह बाहेर काढला. तर 41 तर रुग्णांना गंभीर ते किरकोळ दुखापतींवर घटनास्थळी उपचार केले गेले आणि नंतर पुढील वैद्यकीय सेवेसाठी विविध आरोग्य सेवा सुविधांमध्ये नेण्यात आले.

हे ही वाचा :

मणिपूरमधील ‘ताे’ व्हिडिओ सोशल मीडियावरुन काढून टाकण्याचे केंद्राचे निर्देश

मणिपूरमधील घटनेचे देशभरात तीव्र पडसाद, पंतप्रधान म्हणाले, ‘माझे हृदय वेदनांनी भरले’; सर्वोच्च न्यायालयानेही व्यक्त केला तीव्र संताप

Back to top button