दोषींना माफी नाही : मणिपूरमधील घटनेवर पंतप्रधान मोदींची स्‍पष्‍टोक्‍ती

Pm Modi on Sharad Pawar
Pm Modi on Sharad Pawar

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मणिपूरमध्ये दोन्ही मुलींसोबत जे घडले ते अतिशय दुःखद आहे. मला या घटनेने खूप दु:ख झाले आहे. या प्रकरणातील दोषीला माफी मिळणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  स्‍पष्‍ट केले. आज
(दि.२०) सकाळी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु हाेण्‍यापूर्वी माध्‍यमांशी ते बाेलत हाेते. (PM Modi on Manipur Violence)

मागील दोन महिन्‍यांपासून अधिक काळ हिंसाचारात होरपळणार्‍या मणिपूर राज्‍यात संतापजनक आणि मानवतेला अत्‍यंत लाजिरवाणी करणारी घटना समोर आली आहे. राज्‍यात एक व्‍हिडिओ व्‍हायरल झाला असून त्‍यामुळे दोन महिलांची विवस्‍त्र धिंड काढल्‍याचे दिसते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची गंभीर दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे.

PM Modi on Manipur Violence :  मणिपूरमधील घटना अतिशय दुःखद

संसदेच्‍या अधिवेशन सुरु होण्‍यापूर्वी माध्‍यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की, मणिपूरमध्ये दोन्ही मुलींसोबत जे घडले ते अतिशय दुःखद आहे. मला या घटनेने खूप दु:ख झाले आहे. या प्रकरणातील दोषीला माफी मिळणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

सर्व खासदारांना त्यांची जबाबदारी पार पाडावी लागेल आणि सभागृहाचा जनतेसाठी चांगला उपयोग करावा लागेल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा उपयोग लोककल्याणाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संसद सदस्य करतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आणि सांगितले की चर्चा जितकी जलद होईल तितका परिणाम सार्वजनिक हितासाठी होईल, अशी अपेक्षाही त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.
मणिपूर व्‍हिडिओ प्रकरणाची सर्वोच्‍च न्‍यायालयनेही घेतली गंभीर दखल

मणिपूरमध्‍ये दोन महिलांची 'विवस्‍त्र' धिंड काढण्‍याच व्हिडिओ काल समोर आला होता. याची गंभीर दखल सर्वोच्‍च न्‍यायालयाने घेतली आहे. मणिपूरमध्‍ये दोन महिलांची 'विवस्‍त्र' धिंड काढण्‍याच व्हिडिओ काल समोर आला होता. हा प्रकार खरोखरच व्‍यथित करणार आहे, अशी टिप्‍पणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने केली आहे. तसेच या प्रकरणी केंद्र सरकारने कारवाई करावी, असे सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निर्देश दिले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news