Ooman Chandy : केरळचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चंडी यांचे निधन

Ooman Chandy
Ooman Chandy

पुढारी ऑनलाईन डेस्क :  केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चंडी यांचे मंगळवारी (दि.१७) पहाटे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. याबाबत ओमन चंडी यांच्या मुलाने फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली. बंगळूरू येथील चिन्मय मिशन रुग्णालयात त्यांना बराच काळ दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Ooman Chandy )

 Ooman Chandy : दोन वेळा केरळचे मुख्यमंत्री

माजी मुख्यमंत्री ओमन चंडी २०१९ पासून आजारी होते. घशाचा आजार वाढल्यानंतर त्यांना जर्मनीला नेण्यात आले. ते दोन वेळा केरळचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. १९७० पासून त्यांनी राज्य विधानसभेत पुथुपल्ली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के सुधाकरन यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की,"प्रेमाच्या सामर्थ्याने जगावर विजय मिळवणाऱ्या राजाच्या कथेचा मार्मिक शेवट झाला. आज, ओमन चंडी  यांच्या  निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांनी असंख्य व्यक्तींच्या जीवनाला आणि त्यांच्या वारशाला स्पर्श केला आहे. आमच्या आत्म्यात त्यांच्या आठवणी कायम  राहतीलल,"

राज्यात दोन दिवसांचा दुखवटा 

केरळ सरकारने माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news