घाऊक महागाई निर्देशांक आठ वर्षाच्या निचांकी स्तरावर | पुढारी

घाऊक महागाई निर्देशांक आठ वर्षाच्या निचांकी स्तरावर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कच्चे तेल, नैसर्गिक वायू, वस्त्रे, बेसिक मेटल्स, खाद्यान्न श्रेणीतील वस्तू तसेच मिनरल ऑईलच्या दरात घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरत्या जून महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक ( डब्ल्यूपीआय ) उणे ४.१२ टक्के इतका नोंदविला गेला आहे. महागाई दराचा हा गेल्या आठ वर्षातला निचांकी स्तर आहे.

मे महिन्यात डब्ल्यूपीआय निर्देशांक उणे ३.४८ टक्के इतका होता. सलग तिसऱ्या वर्षात महागाई दर उणे नोंदविला गेला आहे, हे विशेष. याआधी ऑक्टोबर २०१५ मध्ये डब्ल्यूपीआय निर्देशांक उणे सव्वा चार टक्क्यांच्या आसपास होता. जून महिन्यात भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी अन्य श्रेणीतील वस्तुंच्या किंमती कमी झाल्याचे व्यापार मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

वर्षभरापूर्वी म्हणजे, जून २०२२ मध्ये डब्ल्यूपीआय निर्देशांक १६. २३ टक्क्यांवर होता. घाऊक महागाई निर्देशांकाचे आकडे उणे असले तरी किरकोळ महागाई निर्देशांक मात्र, तीन महिन्यांच्या घसरणीनंतर पहिल्यांदाच वाढलेला आहे. जून महिन्यात सीपीआय निर्देशांक ४.३१ टक्क्यांच्या तुलनेत ४.८१ टक्क्यांपर्यंत वाढला होता.

हेही वाचा : 

Back to top button