पाटणामध्‍ये पाेलिसांचा लाठीमार, भाजप नेत्‍याचा मृत्यू

बिहारमधील शिक्षकांच्या नियुक्तीवरून भाजपच्‍या वतीने निदर्शने करण्‍यात आली. यावेळी जमावाला पांगविण्‍यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
बिहारमधील शिक्षकांच्या नियुक्तीवरून भाजपच्‍या वतीने निदर्शने करण्‍यात आली. यावेळी जमावाला पांगविण्‍यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारमधील शिक्षकांच्या नियुक्तीवरून भाजपच्‍या वतीने आज ( दि. १३) राजधानी पाटणा येथे विधानसभेबाहेर निदर्शने केली. यावेळी जमावाला पांगविण्‍यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यामध्‍ये गंभीर जखमी झालेले भाजप नेते विजय कुमार सिंह यांचा मृत्‍यू झाला आहे. या घटनेची माहिती भाजप खासदार सुशील मोदी यांनी ट्विटरच्‍या माध्‍यमातून दिली. या प्रकरणी दोषी कर्मचार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्‍यांनी केली आहे. ( Patna protests )

जखमी विजय कुमार सिंह यांचा उपचारापूर्वीच मृत्‍यू

बिहार भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष सम्राट चौधरी यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली सकाळी ११ वाजता. शेकडो कार्यकर्ते रस्‍त्‍यावर उतरले.ते थून गोलांबरमार्गे जेपी डाक बंगला चौकाजवळ पोहोचले.रोजगार शिक्षकांना राज्यकर्माचा दर्जा देण्याची मागणी भाजपने केली. तैनात असलेल्या पाटणा पोलिसांनी प्रथम भाजप नेत्यांना मागे हटण्यास सांगितले. भाजप कार्यकर्ते आणि नेते आपल्‍या मागणीवर ठाम राहिले. जमावाला पांगविण्‍यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी नेते व कार्यकर्त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. लाठीमारात विजय सिन्हा यांच्यासह अनेक नेते जखमी झाले. ( Patna protests )

जहानाबादचे भाजप सरचिटणीस विजय कुमार सिंह हे पोलीस लाठीमारात जखमी झाले.त्‍यांच्‍या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तेथून त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्‍णालयाद दाखल करण्‍यात आले. येथे त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील मोदी यांनी दिली. पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारामध्‍ये आमच्या पक्षाचे विजय कुमार सिंह यांचा मृत्यू झाला हे खूप दुर्दैवी आहे.आम्ही पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करु. या संपूर्ण प्रकरणाला बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार जबाबदार आहेत, असा आरोपही त्‍यांनी केला. दरम्‍यान, पाटणाचे वरिष्‍ठ पोलीस अधिकारी राजीव मिश्रा यांनी सांगितले की, विजय कुमार सिंह छज्जूबागमध्ये बेशुद्धावस्थेत सापडले होते. त्याच्या शरीरावर बाह्य जखमेच्या खुणा नाहीत. मृत्यूची पुष्टी अद्याप होऊ शकलेली नाही.

बिहारमधील सरकारकडून लाेकशाहीवर हल्‍ला : जेपी नड्डा

भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, पाटण्यात भाजप कार्यकर्त्यांवर झालेला लाठीमार हा राज्य सरकारच्या अपयशाचा आणि अकार्यक्षमतेचा परिणाम आहे. बिहारमधील महागठबंधन सरकार भ्रष्टाचाराच्या संरक्षणासाठी लोकशाहीवर हल्ला करत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news