Delhi Murder case : महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळल्याने दिल्ली हादरली | पुढारी

Delhi Murder case : महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळल्याने दिल्ली हादरली

नवी दिल्ली : श्रद्धा वालकरपाठोपाठ राजधानी दिल्लीत काळजाचा थरकाप उडवणारे आणखी एक हत्याकांड उघडकीस आले आहे. गीता कॉलनी उड्डाणपुलाजवळ एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पोलिसांना बुधवारी सकाळी 30 ते 35 वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळला. प्लास्टिकच्या दोन बॅगांमधून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. त्यातील एका बॅगमध्ये महिलेचे डोके, तर दुसर्‍या बॅगमध्ये अन्य अवयव आढळले आहेत. काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील महरोली परिसरात श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे फेकून देण्यात आले होते.

Back to top button