

पुढारी ऑनलाईन : आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) ३०० अधिक अंकांनी वाढून ६५,६०० वर गेला. तर निफ्टी (Nifty) १९,४०० वर पोहोचला. बाजारातील तेजीत रिलायन्स, एचडीएफसी यांचे शेअर्स आघाडीवर होते. (Stock Market Updates)
सेन्सेक्सवर रिलायन्स, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एसबीआय, एचडीएफसी, मारुती, एम अँड एम, एलटी, आयसीआयसीआय, भारती एअरटेल हे शेअर्स वाढले आहेत. तर एचसीएल टेक, टायटन, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्तान युनिलिव्हर, टीसीएस, विप्रो, टेक महिंद्रा हे शेअर्स घसरले आहेत.
याआधी गेल्या शुक्रवारी सेन्सेक्स ६५,२८० वर बंद झाला होता. आज सोमवारी तो ६५,४८२ वर खुला झाला. त्यानंतर त्याने ६५,६१६ अंकांपर्यंत झेप घेतली. (Stock Market Updates)
अमेरिकेतील महागाई दराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी आशियाई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची सावध भूमिका दिसून आली. जपानचा निक्केई ०.८ टक्क्यांनी खाली आला आहे. अमेरिकेतील एस अँड पी आणि नॅस्डॅक निर्देशांकही घसरले आहेत.
हे ही वाचा ;