Piyush Goyal: मुक्त व्यापार करारासंदर्भातील चर्चेसाठी पियुष गोयल ब्रिटनचा दौरा करणार | पुढारी

Piyush Goyal: मुक्त व्यापार करारासंदर्भातील चर्चेसाठी पियुष गोयल ब्रिटनचा दौरा करणार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: मुक्त व्यापार करारासंदर्भातील (एफटीए) चर्चेसाठी व्यापार मंत्री पियुष गोयल हे 10 आणि 11 जुलै रोजी ब्रिटनचा दौरा करणार असल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
भारत आणि ब्रिटन यांच्या दरम्यान मुक्त व्यापार करार व्हावा, यासाठी मागील काही काळापासून प्रयत्न सुरु आहेत. ब्रिटन दौऱ्यावेळी गोयल हे युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनच्या सदस्यांची भेट घेणार आहेत. दोन्ही देशांसाठी लाभदायक ठरावा, अशा प्रकारचा मुक्त व्यापार करार करण्याच्या अनुषंगाने भारत आणि ब्रिटन यांच्यात बोलणी सुरु आहेत. त्यादृष्टीने गोयल हे ब्रिटनच्या व्यापार खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत.
शिवाय तेथील व्यापार मंत्र्यांशी त्यांची स्वतंत्र बैठक होणार आहे. ब्रिटनमधील विविध उद्योगांच्या प्रतिनिधीना ते भेटणार असल्याचे समजते. उभय देशांमधील व्यापार अडथळे हटविणे, गुंतवणुकीला चालना देणे, तंत्रज्ञान व आयपी हक्क क्षेत्रातील सहकार्य वाढविणे यावर चर्चेचा भर राहील.

Back to top button