Pakistani Drone Shot : अमृतसर आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनला बीएसएफने पाडले | पुढारी

Pakistani Drone Shot : अमृतसर आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनला बीएसएफने पाडले

पुढारी ऑनलाइन डेस्क : Pakistani Drone Shot : पंजाबमधील अमृतसरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ बीएसएफने अंमली पदार्थ घेऊन जाणारा पाकिस्तानी ड्रोन पाडला. बीएसएफच्या 144 कॉर्प्सच्या जवानांनी बीओपी राजाताल परिसरात एक ऑपरेशन केले. ज्यामध्ये एक ड्रोन पाडण्यात आला. हेरॉईनची संशयास्पद 2 पाकिटे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती अजय कुमार मिश्रा, बीएसएफ कमांडंट, अमृतसर यांनी दिली आहे. एएनआयने याचे वृत्त दिले आहे.

अधिकारी पुढे म्हणाले, झडतीदरम्यान हेरॉईनची संशयित दोन पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. याआधी रविवारी, अधिकाऱ्यांनी सांगितले की, बीएसएफने पंजाबमधील अमृतसरजवळील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अंमली पदार्थ वाहून नेणारे पाकिस्तानी ड्रोन पाडले.

बीएसएफने एका निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी रात्री 8.48 च्या सुमारास अमृतसर जिल्ह्यातील धानोए कलान गावात एका संशयित पाकिस्तानी ड्रोनचा आवाज ऐकू आला. “बीएसएफच्या जवानांनी ताबडतोब प्रत्युत्तर दिले आणि ड्रोनला निर्धारित केलेल्या कवायतीनुसार रोखले आणि पाकिस्तानी ड्रोनला प्रतिबंधित पदार्थांसह यशस्वीरित्या पाडले.” असे बीएसएफने सांगितले.

या भागाच्या प्राथमिक झडतीदरम्यान, बीएसएफच्या जवानांनी शेतातून “ड्रोन (क्वाडकॉप्टर, डीजेआय मॅट्रीस, 300 आरटीके) आणि संशयित अंमली पदार्थांची तीन पाकिटे असलेली एक खेप जप्त केली. जी लोखंडी रिंगद्वारे ड्रोनशी जोडलेली होती. बीएसएफने सांगितले की, तस्करांना सहज शोधण्यासाठी चार चमकदार पट्ट्याही मालाशी जोडल्या गेल्या होत्या.

“संशयित हेरॉइनच्या जप्त केलेल्या मालाचे एकूण वजन अंदाजे 3.3 किलो आहे. सतर्क बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानचा आणखी एक नापाक प्रयत्न हाणून पाडला,”

भारतीय लष्कराची कमाल : पाकिस्तानी ड्रोनवर लक्ष ठेवण्यासाठी घारींना प्रशिक्षण

India Pakistan Border : पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आढळला पाकिस्तानी ड्रोन

चर्चा ‘राईट टू वॉक’ची

Back to top button