Chandrayaan-3 mission : ‘चांद्रयान- ३’ चे प्रक्षेपण १४ जुलैला होणार! ‘इस्रो’ची मोठी घोषणा

Chandrayaan-3 mission : ‘चांद्रयान- ३’ चे प्रक्षेपण १४ जुलैला होणार! ‘इस्रो’ची मोठी घोषणा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच 'इस्रो' येत्या १४ जुलै रोजी 'चांद्रयान- ३' लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात बुधवारी 'चांद्रयान- ३'ची एन्कॅप्स्युलेटेड असेम्ब्ली 'एलव्हीएम ३' सोबत जोडण्यात आली. चांद्रयान-३ च्या मोहिमेला दिवसेंदिवस वेग (Chandrayaan-3 mission) येत आल्याचे दृश्य आहे, असे 'इस्रो'ने व्हिडीओ ट्विट करून सांगितले आहे.

'चांद्रयान-३'चे लँडर चंद्रावर उतरण्यात यशस्वी झाले, तर भारत अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश ठरेल. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने आपले अंतराळ यान चंद्रावर उतरवले आहे. 'चांद्रयान-२' २२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. चंद्राचा अभ्यास करणे हा हेतू २ महिन्यांनंतर ७ सप्टेंबर २०१९ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या प्रयत्नात असलेले विक्रम लँडर नष्ट झाले. तेव्हापासून भारत 'चांद्रयान- ३' मोहिमेची (Chandrayaan-3 mission) तयारी करत आहे.

Chandrayaan-3 mission: चंद्राचा अभ्यास करणे हा हेतू

चांद्रयान मोहिमेंतर्गत 'इस्रो'ला चंद्राचा अभ्यास करायचा आहे. भारताने २००८ मध्ये पहिल्यांदा 'चांद्रयान-१'चे यशस्वी प्रक्षेपण केले होते. यानंतर २०१९ मध्ये 'चांद्रयान-२'च्या प्रक्षेपणात भारताला अपयश आले. आता भारत 'चांद्रयान- ३' लाँच करून इतिहास रचण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचे प्रक्षेपण केले जाईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news