Maharashtra Political Crisis : 13 पक्षांच्या प्रागतिक पक्षांचा पर्याय

Maharashtra Political Crisis  : 13 पक्षांच्या प्रागतिक पक्षांचा पर्याय
Published on
Updated on

अलिबाग ः जयंत धुळप राज्यातील सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या सत्तासंघर्षात अंतिमतः एकनाथ शिंदे गटाबरोबर अजित पवार गटाचे आमदार हे अपात्र ठरणार असून त्यांना पुढील सहा वर्षे निवडणुकीला उभे राहता येणार नाही, असा दावा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी करून राज्यातील जनसामान्यांना प्रागतिक पक्ष या नव्या पक्षाचा पर्याय आम्ही उपलब्ध करून देत असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले. (Maharashtra Political Crisis)

आमदारांच्या अपात्रतेमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. सद्य:स्थितीत राज्यातील गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, कामगार असा जनसामान्यांना कोणीही वाली राहिलेला नाही. सातत्याने प्रतिगामी शक्ती वाढत आहेत. यास आळा घालून जनसामान्यांच्या हिताकरिता राज्यातील विविध 13 राजकीय पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन राज्यात प्रागतिक पक्ष या नव्या पक्षाचा पर्याय उभा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी पुढे सांगितले. (Maharashtra Political Crisis)

राज्यातील या नव्या प्रागतिक पक्षात शेतकरी कामगार पक्षासह माजी खासदार राजू शेट्टी (स्वाभिमानी पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना), कॉ. भारत पाटणकर (श्रमिक मुक्ती दल), नाथाभाऊ शेवाळे (जनता दल – सेक्युलर), आ. हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी) , आ. अबू आसिम आझमी (अध्यक्ष, समाजवादी पक्ष, मुंबई / महाराष्ट्र), कॉ. डॉ. भालचंद्र कांगो (सदस्य, सचिव मंडळ, भा.क.पा.), अ‍ॅड. डॉ. सुरेश माने (संस्थापक /अध्यक्ष, बी.आर.एस.पी.), (Maharashtra Political Crisis)

राज्य सरकार स्थापनेत प्रागतिक पक्ष निर्णायक ठरणार

आमदार जयंत पाटील पुढे म्हणाले, सद्य:स्थितीत प्रागतिक पक्षात समाविष्ट या सर्व राजकीय पक्षांचे राज्य विधानसभेत एकूण 11 आमदार आहात. आगामी म्हणजे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ही आमदारांची संख्या 30 पर्यंत नेण्याची क्षमता या नव्या पक्ष संघटनेत आहे. त्यातून राज्य सरकार उभे करताना एका निर्णायक पक्षाची भूमिता प्रागतिक पक्ष निभावेल. प्रागतिक पक्ष सरकार उभारणीच्या वेळी कुणा एका वा एकेका राजकीय पक्षाबरोबर बोलणी करणार नाही तर सर्व पक्षांशी संयुक्तरीत्या खुली चर्चा करेल आणि सक्षम सरकार उभारणीचे काम करू, अशी संकल्पना आमदार पाटील यांनी स्पष्ट केली. (Maharashtra Political Crisis)

राज्यात 500 प्रशिक्षित तरुण कार्यकर्त्यांची फौज तयार करणार

राज्यात राजकीय पक्षांच्या आघाड्या करताना युवकांचा विचार केला गेलेला नाही. पुढील काळात राज्य नियंत्रण हे युवकांच्याच हाती देणे क्रमप्राप्त आहे. त्या द़ृष्टिकोनातून प्रतिगामी शक्तीच्या विरोधात ठामपणे उभे राहू शकणारे तरुण कार्यकर्ते घडविणे हे अनिवार्य आहे आणि त्याचकरिता येत्या 9 व 10 जुलै रोजी पुणे येथे प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र सत्ता परिवर्तन अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास शिबरात प्रागतिक पक्षात समाविष्ट 13 विविध पक्षांतील प्रमुख 25 तरुण कार्यकर्ते व अन्य कार्यकर्ते अशा एकूण 500 कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले जाणार असल्याचे नियोजन आमदार पाटील यांनी अखेरीस सांगीतले. (Maharashtra Political Crisis)

कोणते ते पक्ष (Maharashtra Political Crisis)

मेराज सिद्दीकी (प्रवक्त, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र), कॉ. डॉ. अशोक ढवळे (पॉलिट ब्युरो सदस्य, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), प्रा. संजीव चांदोरकर, कॉ. उदय भट व कॉ. विजय कुलकर्णी (लाल निशाण पक्ष), प्रताप होगाडे (जनता दल सेक्युलर महाराष्ट्र), कॉ. किशोर ढमाले (सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष), रमेश पाटील (बी.आर.एस.पी.), श्यामदादा गायकवाड (संस्थापक / अध्यक्ष – आर.पी.आय. सेक्युलर), कॉ. अजित पाटील (सी.पी.आय.(एम.एल.) लिबरेशन), दत्ता देसाई (समाज विज्ञान अकादमी), डॉ. श्रीमती घोनमोडे (बी.आर.एस.पी.), कॉ. स्मिता पानसरे (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), कॉ. उदय नारकर (सचिव – मा.क.प. महाराष्ट्र राज्य), कॉ. अ‍ॅड. सुभाष लांडे (सचिव, भा.क.प. महाराष्ट्र राज्य), अ‍ॅड. डॉ. सुरेश माने (बी.आर.एस.पी.), प्रा. शरद पाटील (जनता दल, सेक्युलर महाराष्ट्र) ए प्रा. एस. व्ही. जाधव (भारतीय शेतकरी कामगार पक्ष), अ‍ॅड. राजेंद्र कोरडे (शेतकरी कामगार पक्ष) यांचा पाठिंबा व समावेश असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी पुढे सांगितले. (Maharashtra Political Crisis)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news