भारतीय भूमीवरून होणार कैलास दर्शन! | पुढारी

भारतीय भूमीवरून होणार कैलास दर्शन!

नैनिताल, वृत्तसंस्था : भारतीय हद्दीतूनही कैलास पर्वताचे दर्शन घेता यावे म्हणून उत्तराखंड सरकार पिथोरागड जिल्ह्यातील जुन्या लिपुलेखजवळ व्यवस्था करण्याच्या योजनेवर काम करत आहे. नाभीढांगपासून 9 किमीपर्यंत रस्ता आहे. दोन किमी पायी चढाई केल्यावर 17 हजार 500 फूट उंचीवर लिपुलेख खिंड आहे. तेथून कैलास पर्वताचे दर्शन होते.

त्याचे हवाई अंतर 18 किमी आहे, असे कुमाऊं विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ए. पी. वाजपेयी यांनी सांगितले. 2019 मध्ये गलवानमध्ये भारत-चीन सैनिकांतील धुमश्चक्रीनंतर कैलास मानसरोवर यात्रा बंद झाली. नाभीडांगपासूनचा वरच्या भागात सामान्य नागरिकांना जाण्यास मनाई आहे. त्यासाठी लष्कराची परवानगी घ्यावी लागते. उत्तराखंड सरकारची यासंदर्भात केंद्र सरकारशी सुरू असलेली चर्चाही आता अंतिम टप्प्यात आहे.

Back to top button