Special Olympics World Games Berlin 2023 : बर्लिन ‘स्पेशल’ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे PM मोदींकडून कौतुक

Special Olympics World Games Berlin 2023 : बर्लिन ‘स्पेशल’ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे PM मोदींकडून कौतुक

पुढारी ऑनलाइन डेस्क : Special Olympics World Games Berlin 2023 :  बर्लिन स्पेशल ऑलिम्पिक समर गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सर्व खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट करून या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्स ही जगातील सर्वात मोठी समावेशक क्रीडा स्पर्धा आहे. जी खास दिव्यांगांसाठी आयोजित केली जाते. यामध्ये हजारो दिव्यांग खेळाडू सहभागी होतात. 17 ते 25 जून 2023 या कालावधीत, विशेष ऑलिम्पिक जागतिक खेळ बर्लिन येथे आणि प्रथमच जर्मनीमध्ये झाले. यामध्ये 76 सुवर्ण पदकांसह एकूण 202 पदक भारतीय खेळाडूंनी जिंकले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बर्लिनमधील स्पेशल ऑलिम्पिक समर गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि 76 सुवर्ण पदकांसह 202 पदके जिंकणाऱ्या आमच्या अतुलनीय खेळाडूंचे अभिनंदन. त्यांच्या यशामध्ये, आम्ही सर्वसमावेशकतेची भावना साजरी करतो आणि या उल्लेखनीय खेळाडूंच्या चिकाटीचे कौतुक करतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news