MP Truck Accident : मध्य प्रदेशातील दतिया येथे ट्रक नदीत उलटला; 12 ठार | पुढारी

MP Truck Accident : मध्य प्रदेशातील दतिया येथे ट्रक नदीत उलटला; 12 ठार

पुढारी ऑनलाइन डेस्क : MP Truck Accident : मध्यप्रदेशातील दतिया जिल्ह्यात एका निर्माणाधीन पुलाजवळ एक मिनी ट्रक (डीसीएम गाडी) नदीत उलटला आहे. घटनेत एक 12 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याशिवाय 30 ते 35 लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि एसपी घटनास्थळी पोहोचले आहेत. तर राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी घटनेची माहिती घेतली असून ते स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्साडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुहारा गावाजवळ पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे नदीवर स्लिप करून वाहने बाहेर काढली जात होती. मंगळवारी रात्री लोकांचा भरलेला डीसीएम तिथून जात असताना नियंत्रण सुटून हा ट्रक घुवरा नदीत उलटला. MP Truck Accident

या डीसीएम मधील लोक ग्वालियर येथील बिलहेटी गावातील राहणारे आहेत. ते टीकमगढ येथील जतारा येथे मुलीला घेऊन लग्न समारंभासाठी निघाले होते. डीसीएममध्ये साधारण 50-60 लोक होते. या दरम्यान ही दुर्घटना घडली. दरम्यान अद्यापही बचाव कार्य सुरू आहे. दतियाचे पोलिस अधिक्षक प्रदीप शर्मा यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

MP Truck Accident : 3 मुलांसह 5 जणांचे मृतदेह बाहेर काढले

प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत 12 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेत तीन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये एक 18 वर्षाचा युवक, 65 वर्षीय महिला आणि 3 लहान मुले यांचा समावेश आहे. तर 10-12 लोकांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिश्रा यांनी ही खूपच दुखद घटना असल्याचे म्हटले आहे. आमची पहिली प्राथमिकता जखमींवर योग्य उपचार करणे ही आहे, असे ते म्हणाले.

हे ही वाचा :

Odisha Accident: गंजममध्ये भीषण बस अपघातात १० ठार, ८ जखमी

Accident Insurance : वैयक्तिक अपघात विमा कशासाठी गरजेचा?

Back to top button