तुरुंगवास टाळण्‍यासाठी केजरीवालांची भाजपशी तडजोड : काँग्रेसचा गंभीर आरोप

तुरुंगवास टाळण्‍यासाठी केजरीवालांची भाजपशी तडजोड : काँग्रेसचा गंभीर आरोप

नवी दिल्‍ली, पुढारी वृत्तसेवा : पाटणा येथे विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर  आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमधील वाद पुन्‍हा एकदा चव्‍हाट्यावर आला आहे.  काँग्रेस नेते अजय माकन ( Ajay Maken ) यांनी आज (दि. २५) अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांच्यावर गंभीर आरोप केला. त्‍यांनी केलेल्‍या आरोपांमुळे पुन्‍हा एकदा आप आणि काँग्रेस आमने-सामने आल्‍याचे चित्र आहे. ( Congress Vs AAP )

अजय माकन म्‍हणाले की, एकीकडे अरविंद केजरीवाल काँग्रेसचा पाठिंबा घेतात आणि दुसरीकडे राजस्थानमध्ये जाऊन काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात वक्तव्ये करतात. त्याचबरोबर विरोधी पक्षांची एकजूट तोडणे हेच आम आदमी पक्षाचे एकमेव ध्येय आहे. तुरुंगवास टाळण्‍यासाठी केजरीवालांची भाजपशी तडजोड केली आहे, असा गंभीर आराेप त्‍यांनी केला.

अजय माकन म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांना काँग्रेसचा पाठिंबा हवा आहे की त्यापासून दूर राहायचे आहे. आम आदमी पक्षाचे नेते वारंवार काँग्रेसविरोधात वक्तव्य करत आहेत. पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीच्या दिवशीही काँग्रेसविरोधात वक्तव्य करण्यात आले, असेही ते म्‍हणाले.

Congress Vs AAP : भ्रष्‍ट साथीदारांना बाहेर काढण्‍याची धडपड

अरविंद केजरीवाल भारतीय जनता पक्षात सामील झाले आहे. तुरुंगात जाणे टाळण्‍यासाठी त्‍यांची धडपड सुरु आहे. त्यांनी भ्रष्टाचार केला असून त्‍यांना तुरुंगात धाडण्‍याची सर्व तयारी करण्यात आली आहे. त्यांचे दोन साथीदार भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. भाजपशी तडजोड करून त्यांना बाहेर काढायचे आहे, असाही आरोप अजय माकन यांनी केला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news