‘Emergency : आणीबाणीवर इंदिरा गांधी काय म्हणाल्या होत्या? | पुढारी

'Emergency : आणीबाणीवर इंदिरा गांधी काय म्हणाल्या होत्या?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Emergency : आज 25 जून ही तारीख देशाच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून संबोधली जाते. 18 जूनला मन की बातमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या दिवसाला काळा दिवस म्हणून संबोधले होते. कारण याच तारखेला इंदिरा गांधी यांनी आणीबाणी (Emergency) देशावर लादली होती. देशाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे आणीबाणी लागू करण्यात आली होती. 25 जून 1975 ते 23 जानेवारी 1977 पर्यंत ही आणीबाणी लादण्यात आली होती. जाणून घ्या त्या आणीबाणीची सूत्रे कशी हलवण्यात आली. तसेच या आणीबाणीवर इंदिरा गांधी यांनी काय म्हटले होते… एक सविस्तर वृत्तांत…

Emergency : आणीबाणीची पार्श्वभूमी

राज नारायण यांनी दाखल केलेल्या इंदिरा गांधी यांच्या विरोधातील याचिकेवर 12 जून 1975 प्रयागराज उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जगमोहन लाल सिन्हा यांनी इंदिरा गांधी यांच्या विरोधात निर्णय दिला. इंदिरा गांधी यांची लोकसभेची निवडणूक रद्द केली. तसेच 6 वर्षांसाठी त्यांना कोणत्याही संवैधानिक पदासाठी अयोग्य घोषित करण्यात आले. इथेच आणीबाणीचे बीज रुजले…

24 जून 1975 प्रयागराज उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाचे जस्टिस कृष्णा अय्यर यांनी खटला सुरू असेपर्यंत इंदिरा गांधी प्रधानमंत्री पदावर राहू शकतात मात्र ते कोणत्याही चर्चेत किंवा वोट करण्याचा अधिकार वापरू शकत नाही.

Emargancy : सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय इंदिरा गांधी तसेच समर्थकांना आवडला नाही.

याचवेळी देशात भ्रष्टाचार आणि मागाईच्या मुद्द्यावरून असंतोष निर्माण होत होता. जयप्रकाश नारायण यांनी 25 जून रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानात सरकार विरोधात मोठी रॅली बोलावली होती.

Emergency : देशाला शॉक ट्रीटमेंटची गरज – इंदिरा गांधी

इंदिरा गांधी यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू आणि संविधान तज्ज्ञ बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांना आपल्या 1 सफदरजंग रोड वरी आवास स्थानवर लगेच बोलावले. त्यावेळी सिद्धार्थ शंकर हे दिल्लीतील बंग भवनातच होते. ते दोन तास चर्चा करत होते. यावेळी इंदिरा गांधी यांनी देशाला शॉक ट्रीटमेंटची गरज आहे असे म्हटले. जय प्रकाश नारायण यांच्या आंदोलनाविषयी चर्चा केली.

देशाला एका मोठ्या शक्तीची गरज आहे. देशावर मोठे संकट येण्याची शक्यता आहे. देशात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. त्यामुळे खूप मोठे पाऊल उचलणे गरजेचे आहे, असे म्हटले.

Emergency : इंदिरा गांधी यांना होती भीती

इंदिरा गांधी यांनी सिद्धार्थ रे यांना अमेरिकेकडून त्यांची गुप्तचर संस्था CIA च्या मदतीने सरकार उलथून टाकण्याचे प्रयत्न होऊ शकतात. जसे अमेरिकेने चिलीमध्ये जनरल ऑगस्टो पिनोचेट यांचे तख्तापलट केले होते. कैथरीन फ्रैंक यांच्या इंदिरा : द लाइफ ऑफ इंदिरा नेहरू या पुस्तकात म्हटले आहे की इंदिरा यांनी 1974 पासून जयप्रकाश नारायण यांच्यावर आरोप लावले होते की त्यांच्यापाठीमागे अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA यांचा हात आहे. ते त्यांना पैशांचा पुरवठा करत आहे.

अमेरिकी प्रेसिडेंट रिचर्ड निक्सन यांच्या हेट लिस्टमध्ये सर्वात वरच्या स्थानावर आहे, असे इंदिरा यांनी सिद्धार्थ यांना सांगितले होते.

Emergency : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांच्या हेट लिस्टमध्ये का होत्या इंदिरा गांधी?

1971 च्या भारत पाकिस्तान युद्धापूर्वी इंदिरा गांधी अमेरिका दौऱ्यावर गेल्या होत्या. अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्रे देऊ नये यासाठी हा दौरा होता. मात्र निक्सन यांनी इंदिरा गांधी यांना वेळ न दिल्याने इंदिरा गांधी यांनी निक्सन हे ठरलेल्या वेळेत न पोहोचल्यास त्या निघून जातील असा संदेश दिला. मात्र निक्सन यांनी त्याकडे दूर्लक्ष केले. परिणामी इंदिरा गांधी निघून आल्या. ही घटना अनेक वृत्तपत्रांमधून छापून आली होती. त्यामुळे निक्सन यांच्या हेट लिस्टमध्ये इंदिरा गांधी सर्वात वरती होत्या. परिणामी अमेरिका CIA द्वारे आपली सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करणार ही इंदिरा गांधी यांची भीती अनाठायी होती असे म्हणता येत नाही.

Emergency : सिद्धार्थ यांनी इंदिरा यांना 352 कलमांतर्गत आणीबाणी लावण्याचा सल्ला दिला

दोन तासांच्या चर्चेनंतर सिद्धार्थ रे यांनी इंदिरा गांधी यांना वेळ मागितला. साडेतीन वाजता ते पुन्हा भेटले. त्यांनी इंदिरा गांधी यांना भारतीय संविधानातील कलम 352 बद्दल माहिती दिली. आणीबाणी लावण्याचा सल्ला दिला. मात्र, मंत्रिमंडळाची यावर चर्चा घेण्याचा इंदिरा गांधी यांचा विचार होता. त्यावर सिद्धार्थ यांनी त्यांना सल्ला दिला की ते राष्ट्रपतींना मंत्रिमंडळ बोलावण्याएवढा वेळ नाही, असे सांगू शकतात.
त्यानंतर इंदिरा गांधी यांनी वेगवान हालचाली करत राष्ट्रपतींची भेट घेतली आणि सर्व कागदोपत्री आवश्यकता पूर्ण केली.

indira gandhi and sidharth ray
indira gandhi and sidharth ray

Emergency : 25 जूनच्या रात्री सर्व विरोधी पक्ष नेत्यांना अटक

सिद्धार्थ शंकर रे हे इंदिरा गांधी यांना सकाळच्या भाषणासाठी मदद करत होते. तर दुसरीकडे आर के धवन, संजय गांधी, ओम मेहता हे ज्या विरोधी पक्षांना अटक करावयाची आहे त्यांची यादी तयार करत होते.

याशिवाय सकाळी सर्व वृत्तपत्र आणि न्यायालयांच्या वीज कापून टाकण्याची योजना देखील करण्यात येत होती. मात्र याविषयी सिद्धार्थ शंकर रे यांना याविषयी हे माहिती नव्हते.

सिद्धार्थ रे यांना ओम मेहता यांनी जेव्हा ही माहिती दिली. तेव्हा त्यांनी इंदिरा गांधी यांना असे न करण्याचा सल्ला दिला होता. इंदिरा गांधी यांना त्यावेळी इंदिरा गांधी यांनी रे यांना वृत्तपत्राची आणि न्यायालयांची वीज कट केली जाणार नाही, असे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही.

परिणामी 26 जूनच्या सकाळी फक्त हिंदुस्थान टाईम्स आणि स्टेट्समैन ही दोनच वृत्तपत्रे छापली गेली. त्यांना दिल्ली महापालिकेजवळ असल्याने वीज कनेक्शन मिळाले होते.

Emergency : 25 जून च्या रात्री सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना अटक

आणीबाणीच्या घोषणेपूर्वी जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, अरूण जेटली, जयपूरची महाराणी गायत्री देवी, ग्वाल्हेरची राजमाता अशा सर्वच नेत्यांना वेगवेगळ्या कारणांखाली अटक करण्यात आली. आरएसएससह 26 संघटनांवर बंदी घालण्यात आली.

Emergency : 26 जून रोजी आणीबाणीची घोषणा

26 जून रोजी आकाशवाणीवर सर्व प्रथम इंदिरा गांधी यांचे भाषण झाले. त्यांनी लोकांना आणीबाणी लागू झाल्याची घोषणा केली. तसेच यामध्ये लोकांना घाबरण्याची गरज नाही, असे सांगितले.

पुढे ही आणीबाणी 23 जानेवारी 1977 पर्यंत सुरू राहिली. 1977 मध्ये लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा होईपर्यंत ही आणीबाणी सुरू झाली.

Emergency : मैने आपात्काल लगाया तब तो एक कुत्ता भी नहीं भौका था…

दैनिक भास्करच्या माहितीनुसार आणीबाणी नंतरच्या मोठ्या काळात इंदिरा गांधी यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. मैने जब आपात्काल लगाया था तब तो एक कुत्ता भी नहीं भौका था… अर्थात मी आणीबाणी लावली होती तेव्हा एक कुत्रे देखील भूंकले नव्हते.

हे ही वाचा :

‘Emergency’ Teaser Out: कंगनाच्या ‘Emergency’ चित्रपटाचा टीझर रिलिज; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Mann ki Baat : आणीबाणी देशाच्या इतिहासातील काळा अध्याय; मन की बातमधून PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला

Back to top button