Assam Flood : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; ४.८९ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका | पुढारी

Assam Flood : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; ४.८९ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका

पुढारी ऑनलाईन डेस्क : आसाममधील पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. १६ जिल्ह्यांतील सुमारे ४.८९ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. नलबारी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पुराच्या पाण्यात एकाचा बुडून मृत्यू झाल्याने मृतांची संख्या दोन झाली आहे. विविध भागात आणखी पाऊस आणि वादळाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचवेळी राज्यभरातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे.

बजाली, बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, बोनगाईगाव, चिरांग, दररंग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगड, गोलपारा, गोलाघाट, कामरूप, कोक्राझार, लखीमपूर, नागाव, नलबारी, तमूलपूर जिल्ह्यातील ५४ महसूल मंडळांतर्गत १ हजार ५३८ गावे बाधित झाली आहेत. मुसळधार पावसामुळे जोरहाट जिल्ह्यातील नेमातीघाट आणि धुबरी येथे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याने धोका पातळी ओलांडली आहे. जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये १४० मदत शिबिरे आणि ७५ मदत वितरण केंद्रे स्थापन केली असून या मदत छावण्यांमध्ये ३५ हजार १४२ लोकांनी आश्रय घेतला आहे. तर इतर अनेकांनी उंच प्रदेशाच्या ठिकाणी आश्रय घेतला आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएमए) पुराच्या अहवालानुसार, बजाली जिल्ह्यात सुमारे २.६७ लाख लोक बाधित झाले आहेत. त्यानंतर नलबारीमध्ये ८० हजार ६१, बारपेटात ७३ हजार २३३, लखीमपूरमध्ये २२ हजार ५७७ तर दारंगमध्ये १४ हजार ५८३ लोक बाधित झाले आहेत. १४ हजार १८० तामुलपूरमध्ये, ७ हजार २८२ लोक बक्सामध्ये तर ४ हजार ७५० लोक गोलपारा जिल्ह्यात बाधित आहेत. पुराच्या पाण्याने सुमारे १० हजार ७८२ हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे.

हेही वाचा : 

Back to top button