पुढारी ऑनलाईन: कुपवाड्यातील मछल सेक्टरमधील काला जंगलमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांकडून आज (२३ जून) सकाळी मोठी कारवाईत करण्यात आली आहे. या संयुक्त कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधून (PoJK) भारतात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधी भारतीय लष्कराकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.