दीडवर्षात तब्‍बल ७० वेळा वाहतूक नियमांचे उल्‍लंघन, दंड ऐकाल तर म्‍हणाल, हद्दच झाली! | पुढारी

दीडवर्षात तब्‍बल ७० वेळा वाहतूक नियमांचे उल्‍लंघन, दंड ऐकाल तर म्‍हणाल, हद्दच झाली!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क  : शहाण्‍याला शब्‍दांचा मार, असे आपल्‍याकडे म्‍हटलं जाते. मात्र एकच चूक जो वारंवार करतो त्‍याला आपण मूर्ख म्‍हणतो. दीड वर्षांमध्‍ये एकाच व्‍यक्‍तीने तब्‍बल ७० वेळा वाहतूक नियमांचे उल्‍लंघन केले, असे ऐकले तर तुमचा विश्‍वास बसेल का, मात्र हे खरं आहे. उत्तर प्रदेशमधील गौरखपूरमध्‍ये एका तरुणाने हा नकोसा विक्रम आपल्‍या नावावर केला आहे. ( Violating Traffic Rules)

Violating Traffic Rules : दुचाकीची किंमत ८५ हजार दंड ७० हजार!

गोरखपूर पोलिस प्रशासनाने शहरात वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. वाहतूक कोंडी कमी करणे आणि वाहनांची वाहतूक सुरळीत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मात्र वारंवार वाहतूक नियम मोडणे हे काहीच्‍या जगण्‍यातला भाग झाला आहे. एका व्यक्तीला दीड वर्षांच्या कालावधीत ७०वेळा वाहतूक नियमांचे उल्‍लंघन केले. त्याच्या वाहनाची किंमत ८५,००० रुपये असून त्‍याने वाहतूक नियम उल्‍लंघन प्रकरणी आतापर्यंत एकूण ७०,५०० दंड भरला आहे.

गोरखपूर पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने चौकाचौकात ट्रॅफिक कॅमेरे लावले आहेत. हे कॅमेरे ट्रॅफिक सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांच्या नंबर प्लेट्स टिपतात, परिणामी स्वयंचलित तिकीट निर्मिती होते. संबंधित व्‍यक्‍तीने यावर्षी ३३ वेळा तर मागील संपूर्ण वर्षात ३७ वेळा वाहतूक नियमांचे उल्‍लंघन केल्‍याचे स्‍पष्‍ट झाली आहे.

पोलिसांनी जाहीर केली नियम मोडणार्‍या टॉप टेन वाहनांची यादी

वाहतूक पोलिसांनी शहरातील टॉप टेन वाहनांची यादी जाहीर केली आहे ज्यांना सर्वाधिकवेळघ दंड ठोठावण्‍यात आला आहे. अशा दहा जणांच्‍या नावांचा यामध्‍ये समावेश आहे. या व्यतिरिक्त, इतर नऊ व्यक्तींचा देखील या यादीत समावेश आहे, ज्यामध्ये काहींना ५० पेक्षा अधिकवेळा पेक्षा वाहतूक नियमांचे उल्‍लंघन केले आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button