Crime News : धक्कादायक! प्रेमी युगलांचा गोळ्या झाडून निर्घुणपणे खून, कुटुंबियांनीच मृतदेह फेकले नदीत

Crime News : धक्कादायक! प्रेमी युगलांचा गोळ्या झाडून निर्घुणपणे खून, कुटुंबियांनीच मृतदेह फेकले नदीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या ऑनर किलींगची एक घटना समोर आली आहे. एका मुलीची आणि तिच्या प्रियकराची तिच्या कुटुंबाने निर्घूण खून केल्याची घटना घडली. या घटनेत गोळीबार करुन प्रेमीयुगलांचे मृतदेह चंबळ नदीत फेकण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांची हत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी, इतर नातेवाईकांसह या प्रेमीयुगलांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांचा गोळ्या झाडून खून केला आणि त्यांचे मृतदेह चंबळ नदीत फेकले. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुलीचे वडील राजपाल सिंह तोमर यांनी चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तोमरने दावा केला की त्याने कुटुंबातील इतर सदस्यांसह त्यांची मुलगी शिवानी तोमर आणि तिचा प्रियकर राधेश्याम तोमर यांची दि. ३ रोजी हत्या केली आणि नंतर त्यांचे मृतदेह नदीत फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. मुलगा आणि मुलीचे मृतदेह शोधण्यासाठी चंबळ नदीत SDRF टीम आणि डायव्हर्स पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news