पॅन-आधार लिंकसाठी 30 जूनपर्यंत डेडलाईन | पुढारी

पॅन-आधार लिंकसाठी 30 जूनपर्यंत डेडलाईन

नवी दिल्ली : आयकर विभागाने पॅन कार्ड – आधार कार्ड लिंकसाठी 30 जूनपर्यंतची डेडलाईन दिली आहे. या तारखेपर्यंत लिकिंग न केल्यास पॅन आपोआपच निष्क्रिय होणार आहे.

पॅन-आधार लिंक न केल्यास बँक, म्युच्युअल फंड खाते काढण्यास किंवा इतर आर्थिक व्यवहार करण्यात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ज्यांचे पॅन निष्क्रिय झाले आहे, त्यांनी व्यवहारासाठी ते वापरल्यास दहा हजारांचा जबर दंड सोसावा लागणार आहे.

Back to top button