Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादाळाने प्रभावित ‘कच्छ-जखाऊ’ला अमित शहा भेट देणार | पुढारी

Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादाळाने प्रभावित 'कच्छ-जखाऊ'ला अमित शहा भेट देणार

पुढारी ऑनलाइन डेस्क : ‘बिपरजॉय’ (Biparjoy Cyclone)चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) गुजरातच्या कच्छ आणि जाखाऊ बंदराला भेट देणार आहेत. ते मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही बैठक घेणार आहेत. ते प्रथम बाधित भागाचे हवाई सर्वेक्षण देखील करतील.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही शेल्टर होमला भेट देतील आणि लोकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते मांडवीला भेट देतील आणि बाधितांची भेट घेणार आहेत. नंतर गृहमंत्री भुज येथील स्वामी नारायण मंदिराला भेट देतील आणि बाधित लोकांसाठी अन्न साहित्य आणि इतर सुविधांचा आढावा घेतील.

अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ गुरुवारी (दि15) रात्री गुजरातच्या किनाऱ्यावर येऊन धडकले. बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र खवळून प्रचंड मोठ्या लाटा निर्माण झाल्या. तसेच प्रचंड मुसळधार पाऊस पडला. वेगाने वाहणारे वारे-वादळ यामुळे गुजरातच्या कच्छ, जखाऊ, मांडवी या भागात या चक्रीवादळाने भीषण तांडव केले.

मिळालेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाने तब्बल 600 झाडे पडली आहेत. तर अनेक विजेचे खांब कोसळले आहेत. झाडपडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहेत. चक्रीवादळापासून संरक्षणासाठी सरकारने पूर्वीच तयारी केली होती. हजारो लोकांना आधीच स्थलांतरीत केल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळली. तरीही या चक्रीवादळाने दोघांचा मृत्यू झाला तर काही लोक जखमी झाले आहेत. एकूणच या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शहा चक्रीवादळाने प्रभावित क्षेत्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

हे ही वाचा :

थैमान बिपरजॉय चक्रीवादळाचे

Biparjoy Cyclone : गुजरातमध्ये तांडव केल्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळ झाले कमकुवत

Back to top button