सूर्यफूल, सोयाबीन तेल स्वस्त होणार | पुढारी

सूर्यफूल, सोयाबीन तेल स्वस्त होणार

नवी दिल्ली :  आम जनतेला सुखावणारा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यानुसार सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या आयात करात मोठी कपात केली आहे. त्यामुळे या दोन्ही तेलांचे दर कमी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सूर्यफूल आणि सोयाबीन या दोन्ही तेलांवरील आयात कर 17.5 टक्क्यांवरून 12.5 टक्के करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गुरुवारी याविषयीची अधिसूचना जारी केली. खाद्यतेलांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने हे प्रभावी पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.

 

 

 

Back to top button