Manipur Violence : मणिपुरात हिंसाचार सुरूच, इंटरनेट बंदी २० जूनपर्यंत वाढवली

Manipur Violence : मणिपुरात हिंसाचार सुरूच, इंटरनेट बंदी २० जूनपर्यंत वाढवली

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या महिन्याभरापासून मैतई आणि कुकी समुदायातील वादामुळे मणिपूर राज्यात हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपूरमध्ये इंटरनेट बंदी कायम राहणार आहे. राज्य सरकारने 20 जून रोजी दुपारी 3:00 वाजेपर्यंत स्थगिती वाढवली आहे.

मणिपूरमध्ये, अफवा रोखण्यासाठी सरकारने हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इंटरनेटवरील बंदी 9 व्यांदा वाढवली आहे. 3 मे रोजी पहिल्यांदा ही बंदी लागू करण्यात आली होती. मणिपूरमधील जनजीवन सध्या विस्कळीत झाले आहे. अनेक संघटनांनी इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

मणिपूरचे आयुक्त टी रणजित सिंग यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, राज्यात शांतता राखण्यासाठी आणि हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इंटरनेटमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, असेही आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news