Andhra Pradesh : मालगाडी रुळावरून घसरली, १४-१५ जूनला ६ रेल्वे गाड्या रद्द | पुढारी

Andhra Pradesh : मालगाडी रुळावरून घसरली, १४-१५ जूनला ६ रेल्वे गाड्या रद्द

अमरावती (आंध्र प्रदेश) : पुढारी ऑनलाईन डेस्क :  आंध्र प्रदेशमध्ये थाडी-अनकापल्ले रेल्वे स्टेशन दरम्य़ान कोळशांनी भरलेली एक मालगाडी रुळावरून घसरली. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वे (SCR) ने सहा एक्सप्रेस रेल्वे रद्द केले आहेत. (Andhra Pradesh) तसेच वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेची वेळ बदलली आहे. रद्द करण्यात आलेली ६ एक्सप्रेस रेल्वे रद्द करण्यात आली आहेत.  (Andhra Pradesh)

रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या पुढीलप्रमाणे- रेल्वे क्र. १२८०५ विशाखापट्टणम -लिंगमपल्ली (१४ जून २०२३), रेल्वे क्र. १२८०६ लिंगमपल्ली-विशाखापट्टणम, (१५ जून २०२३) रेल्वे क्र. २२७०१ विशाखापट्टणम-विजयवाडा (१४ जून २०२३), रेल्वे क्र. २२७०२ विजयवाडा-विशाखापट्टणम (१४ जून २०२३), रेल्वे क्र. १७२४० विशाखापट्ट्णम -गुंटूर (१४ जून २०२३), रेल्वे क्र. १७२३९  गुंटूर- विशाखापट्ट्णम (१५ जून २०२३).

तसेच रेल्वे क्र. २०८३३ ही विशाखापट्ट्णम सिकंदराबाद (१५ जून २०२३) रेल्वे गाडीची वेळ बदललीय.

घटनेच्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर स्वच्छता सुरु आहे. अशी माहिती सीपीआरओ, दक्षिण मध्य रेल्वेने दिलीय. कोळशाने भरलेली मालगाडी साडे तीन वाजता रुळावरून घसरली. वंदे भारत एक्सप्रेस (रेल्वे क्र २०८३३), जी विशाखापट्टणमहून बुधवार सकाळी ५.४५ वाजता निघणार होती, ती तीन तास उशीरा निघाली.

Back to top button