Conversion through online gaming apps : ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून धर्मांतरण प्रकरणातील आरोपी बद्दो याचे पाकिस्तानी कनेक्शन सापडले

conversion through online gaming app
conversion through online gaming app
Published on
Updated on
पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली, दि. 14, : Conversion through online gaming apps : गेमिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून अल्पवयीन मुले आणि युवकांचे धर्मांतरण करीत असल्याच्या प्रकरणातला आरोपी शाहनवाज उर्फ बद्दो याचे पाकिस्तानी कनेक्शन तपासात समोर आले आहे. बद्दोच्या मोबाईलमध्ये 30 पाकिस्तानी मोबाईल क्रमांक सापडले आहेत.
बद्दो याला 11 मे रोजी अलिबागमध्ये सापळा रचून पकडण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी त्याला गाझियाबाद पोलिसांकडे सुपूर्द केले होते. एटीएस आणि केंद्रीय तपास संस्थांनी सलग सात तास केलेल्या बद्दोच्या चौकशीदरम्यान बरीच माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील एक ई मेल तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील काही लोकांसोबत बद्दो याने केलेले चॅटिंग तपास संस्थांच्या हाती लागले आहे. लाहोरमध्ये राहणाऱ्या एका वाहतूक पोलिसाच्या संपर्कात बद्दो होता, असे समजते.
गाझियाबादमधील ज्या युवकाचे धर्मांतरण करण्यात आले होते, त्याच्याशी बद्दो मोबाईलवरून साडेतीनशे वेळा बोलला होता. लॅपटॉप तसेच मोबाईलमधला बराच डेटा त्याने उडविलेला आहे, त्यामुळे हा डेटा हस्तगत करण्याचा तपास संस्थांचा प्रयत्न आहे. Conversion through online gaming apps 
हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news