IAF Recruitment 2023 : भारतीय हवाई दलात भरती; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया | पुढारी

IAF Recruitment 2023 : भारतीय हवाई दलात भरती; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

पुढारी ऑनलाइन डेस्क : भारतीय हवाई दलात तांत्रिक आणि गैर-तांत्रिक अशा दोन्ही पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली आहे. तर 30 जूनपर्यंत तुम्ही afcat.cdac.in या वेबसाइटवर अर्ज करू शकता.

IAF AFCAT अर्ज फी

AFCAT साठी नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. NCC स्पेशल एंट्रीसाठी नोंदणी करणार्‍या उमेदवारांना अर्ज फी भरण्याची आवश्यकता नाही.

AFCAT वयोमर्यादा

फ्लाइंग बॅच: उमेदवारांचे वय 01/07/2024 रोजी किमान 20 वर्षे ते कमाल 24 वर्षे असावे.
ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक आणि गैर-तांत्रिक): 01/07/2024 रोजी किमान 20 वर्षे ते कमाल 26 वर्षे.

IAF AFCAT शैक्षणिक पात्रता

ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक शाखा): उमेदवारांनी अभियांत्रिकी/तंत्रज्ञानाचा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट इंजिनिअर्स (इंडिया) च्या असोसिएट मेंबरशिपच्या सेक्शन A आणि B परीक्षेत 60% गुण मिळालेले असावेत.

ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल): उमेदवारांनी 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे आणि त्यांनी एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाची विभाग अ आणि ब परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे किंवा इन्स्टिट्यूट इंजिनियर्सचे सहयोगी सदस्यत्व मिळाले असावे.

फ्लाइंग शाखा: उमेदवारांनी भौतिकशास्त्र आणि गणितासह कोणत्याही शाखेत 12 वी किंवा BE/ B.Tech पदवी (चार वर्षांचा अभ्यासक्रम) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% उत्तीर्ण केलेली असावी.

हे ही वाचा :

Railway Recruitment : तयारीला लागा; रेल्वेत लवकरच बंपर भरती; ओडिसा रेल्वे अपघातानंतर हालचालींना वेग

नगर जिल्ह्यात 250 तलाठी पदांसाठी मेगाभरती

राज्यात सहकार आयुक्तालयांतर्गत 751 पदांची भरती

Back to top button