Railway Recruitment : तयारीला लागा; रेल्वेत लवकरच बंपर भरती; ओडिसा रेल्वे अपघातानंतर हालचालींना वेग | पुढारी

Railway Recruitment : तयारीला लागा; रेल्वेत लवकरच बंपर भरती; ओडिसा रेल्वे अपघातानंतर हालचालींना वेग

पुढारी ऑनलाइन डेस्क : रेल्वे बोर्डाने त्यांच्या सर्व विभागांना सुरक्षा श्रेणीतील पदोन्तीसाठी रिक्त जागा भरण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणर आहे. काही दिवसांपूर्वी ओडिसातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वेतील रिक्त जागांवर पदभरती तसेच कर्मचाऱ्यांवर सातत्याने येणाऱ्या कामाच्या ओव्हर टाइमचा तणाव हे सर्व मुद्दे चर्चेचा प्रमुख केंद्रबिंदू बनले आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वेने भरतीबाबत वेगवेगान हालचाली सुरू केल्या आहेत. Railway Recruitment

रेल्वे बोर्डाने सर्व रेल्वे झोनच्या महाव्यवस्थापकांना अंतरिम आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, मंडळाने वेळोवेळी पदोन्नतीच्या रिक्त जागा भरण्याच्या आवश्यकतेवर भर देत या सूचना जारी केल्या आहेत. विभागीय रेल्वेने त्यातील रिक्त पदांचा तपशील तयार करावा आणि त्यावरील भरतीसाठी योजना तयार करावी. यासाठी झोन ​​विशेष मोहीम राबवू शकतात.

Railway Recruitment : भारतीय रेल्वेमध्ये एकूण 3.12 लाख अराजपत्रित पदे रिक्त आहेत.

रेल्वेकडून रिक्त पदांची अद्ययावत माहिती देण्यात आलेली नाही. डिसेंबर 2022 मध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेमध्ये एकूण 3.12 लाख अराजपत्रित पदे रिक्त आहेत. यामध्ये सिग्नल आणि दूरसंचार विभागात एकूण 14,815 आणि वाहतूक परिवहन विभागात 62,264 पदे रिक्त आहेत. त्यांच्या उत्तरानुसार, स्थापत्य अभियांत्रिकी विभागात सर्वाधिक रिक्त जागा होत्या. ज्यात देशभरात 87,654 रिक्त जागा होत्या. त्यानंतर यांत्रिक विभागात 64,346 आणि इलेक्ट्रिकल विभागात 38,096 रिक्त जागा होत्या.

Railway Recruitment : ओडिसातील बहनगा स्टेशन अंतर्गत 17, 811 अराजपत्रित पदे रिक्त

ओडिसातील बालासोर येथे 2 जूनला ज्या बहनगा बाजार स्टेशन येथे अपघात झाला होता त्याठिकाणी 3 फेब्रुवारी 2023 पर्यंत राजपत्रित नसलेल्या पदांसाठी 17,811 आणि 150 रिक्त राजपत्रित पदे आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिली होती.

Railway Recruitment : एक लाखाहून अधिक पदे भरण्याची अपेक्षा

रेल्वेने 2019 मध्ये एक मेगा भरती मोहीम सुरू केली होती आणि सध्या निवडलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. रेल्वे बोर्डाने त्यांच्या सर्व झोनना सुरक्षा श्रेणीतील पदोन्नतीसाठी रिक्त जागा भरण्यासाठी “विशेष मोहीम” सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार आहे.

या अंतर्गत एक लाख पदांसाठी भरती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रेल्वे भरतीच्या निर्देशात म्हटले आहे की, निवड/नॉन-सिलेक्ट/ट्रेड टेस्ट/एलडीसीई (मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा)/जीडीसीई (सामान्य विभागीय स्पर्धात्मक परीक्षा) सारख्या सर्व पद्धतींचा वापर केला जातो, जेणेकरून रिक्त जागा वेळेत भरल्या जातील.

हे ही वाचा :

नगर जिल्ह्यात 250 तलाठी पदांसाठी मेगाभरती

राज्यात सहकार आयुक्तालयांतर्गत 751 पदांची भरती

Army Agniveer Bharti Rally 2023 : अग्निवीर सैन्यभरती मेळावा सुरु, १७ जूनपर्यंत चालणार

Back to top button