तीन ऑनलाईन गेम्सवर येणार बंदी | पुढारी

तीन ऑनलाईन गेम्सवर येणार बंदी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  ऑनलाईन गेम्सचा वापर सट्टेबाजी आणि धर्मांतरणासाठी केला जात असल्याची बाब चव्हाट्यावर आली असल्याच्या पार्श्वभूमीवर तीन प्रकारच्या ऑनलाईन गेम्सवर बंदी आणण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. ज्या गेम्समुळे ऑनलाईन गेमचे व्यसन लागू शकते, असे गेमही बंदीच्या कक्षेत आणले जातील, असे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

ऑनलाईन गेम्सचे व्यसन लागून माणूस त्यात तासन्तास गुरफटून जाऊ शकतो, हे आतापर्यंत सर्वश्रुत होते; पण आता या माध्यमाचा वापर धर्मांतरासाठीही केला जात असल्याचे उघडकीस आल्याने सरकार खडबडून जागे झाले आहे. ऑनलाईन गेम्सच्या अनुषंगाने नवीन नियमावली जाहीर केली जाईल, असे चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button